उद्या आ.बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते विविध रस्ते विकास कामाचा शुभारंभ
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या शुभहस्ते आष्टी तालुक्यातील देवळाली -डोंगरगण -कडा-रुई टाकळी व जिल्हा सरहद्द लोणी- पिंपळा -खुंटेफळ -धानोरा -वृद्धेश्वर या 9 कोटी 50 लाख रुपये किंमतीच्या दोन रस्ता कामाचा शुभारंभ शनिवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी८:०० वाजता टाकळी येथे होणार आहे तरी या परिसरातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा परिषद लोणी गट यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 02 अंतर्गत आष्टी तालुक्यातील देवळाली कडा रुई टाकळी (४कोटी ७५ लाख)या रस्ते कामाचा शुभारंभ आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी८:०० वाजता टाकळी येथे होणार आहे तर जिल्हा सरहद्द लोणी- पिंपळा- धानोरा(४कोटी ७५लाख रुपये ) या रस्ता कामाचा शुभारंभ ९:३० मिनिटांनी पिंपळा येथे होणार आहे ,या कार्यक्रमासाठी माजी आमदार साहेबराव दरेकर नाना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते परमेश्वर काका शेळके ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत, तालुका अध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, काकासाहेब शिंदे,संदिप सुंबरे,सतीश शिंदे, सुनील नाथ ,महेश आजबे, शिवाजी नाकाडे,हरिभाऊ दहातोंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी परिसरातील जनतेने या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणी गट यांच्यावतीने करण्यात आले आहे.