★आ.क्षीरसागर राष्ट्रवादीचे नवे बीड जिल्हाध्यक्ष पक्षाने दिली मोठी जबाबदारी
बीड | प्रतिनिधी
राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाकडून बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादीची जबाबदारी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या खांद्यावर देऊन जिल्ह्याध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आली आहे.
शरदचंद्र पवार साहेब यांचे निष्ठावंत असलेल्या आ.संदीप क्षीरसागर यांची, पक्षकार्यकारिणीकडून जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत बुधवार (दि.१९) रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले. यावर आ.संदीप क्षीरसागर यांनी, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे, त्याबद्दल पक्षाचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेब, कार्याध्यक्षा खा.सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांचे आभार मानतो. तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी सदैव तत्पर असेल अशी ग्वाही दिली.बीड जिल्हा हा सदैव मा.शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.