14.7 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

जामखेड पुन्हा हादरले! डोक्याला पिस्टल लावून कार पळवली

★जामखेड शहरातील तपनेश्वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवली

जामखेड | प्रतिनिधी

जामखेड शहरातील तपनेश्वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवली आरोपीने पोलिसावर पिस्टल रोखले! स्वसंरक्षणासाठी जामखेड शहरातील तपनेश्वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवली. सदर माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले.
यादरम्यान एका आरोपीने पिस्टलमधून पोलीसावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार करून तीनही आरोपी ताब्यात घेतले. जखमी आरोपीला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. जामखेड पोलीसात पोलीस कॉन्स्टेबल संतोष नामदेव कोपनर यांनी फिर्याद दिली की, 19 रोजी 00/10 वा. चे सुमारास आरोपीत  प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार,  शुभम बाळासाहेब पवार, काकासाहेब उत्तम डुने सर्व (रा. सारोळा ता. जामखेड) यांनी जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथे इसम नामे अदनान जहर शेख, (रा. तपश्वररोड, जामखेड ता. जामखेड) यांचे डोक्याला पिस्टल लावून त्याच्या ताब्यातील अर्टिगा गाडीची (एमएच 12 केटी 4795) चोरी केली होती.आम्ही आरोपीत इसम नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमत पवार, शुभम बाळासाहेब पवार व काकासाहेब उत्तम डुचे यांचा शोध घेऊन आमचे सरकारी काम करीत असताना जामखेड ते खर्डा असे जाणारे रोडलगत असलेले हॉटेल साई समोरील मोकळ्या पटांगणात आरोपी नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमत पवार याने त्याचे कमरेला असलेल पिस्टल बाहेर काढुन आम्हाला जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्याचे हातातील पिस्टल आमच्या दिशेने रोखुन, पिस्टलचे ट्रिगर दाबुन आमच्यावर गोळी फायर करण्याचा प्रयत्न केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!