★ 43 विद्यार्थ्यांनी मिळविले शासकीय शिष्यवृत्तीत स्थान !
कुसळंब | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून प्रतिवर्षाप्रमाणे आय. एस. ओ.मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड या शाळेने या निकालात पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त केले आहे.इयत्ता पाचवी चे 22 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले, तर इयत्ता आठवीचे 21 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. एकूण 43 विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असून त्यापैकी आठवीच्या पृथ्वीराज पवार आणि तुषार शेळके यांनी राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती मध्ये देखील आपले स्थान पटकावले आहे. इयत्ता पाचवी मध्ये शिवप्रसाद पोकळे यांने राष्ट्रीय शिष्यवृत्तीत स्थान पटकावले आहे. इयत्ता पाचवी मध्ये सोहम बेदरे,संदेश पालवे, समर्थ पोकळे, आयान पठाण, प्राची रसाळ, मीनाक्षी पवार, शुभम सावंत, गौरी जेधे, वेदांत रुद्रके, अनुष्का सवासे,अमृता मोरे, गौरी सोंडगे ,स्नेहल चव्हाण, संस्कृती पवार ,स्नेहल खाडे ,अक्षरा काकडे, सारिका दिवटे, श्रेयश खेंगरे,विशाल जेधे, वैष्णवी वारे,विराज हडदगुने हे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले असून,इयत्ता आठवी मध्ये पृथ्वीराज पवार, तुषार शेळके, कार्तिकी गुंजकर, सार्थक बेद्रे, दिपाली सानप ,ज्ञानेश्वर रहाटे, प्रजीत घायाळ, वैभव दगडे, अभिषेक पवार, कार्तिक दिवटे, समृद्धी पवार,प्रथमेश भोगल,फातिमा शेख, श्रेयश जरे, मंगेश जरे, अनिशा जरे, पार्थ जायभाय, स्नेहल पवार, ऋषिकेश पवार, भक्ती पवार, प्रतीक्षा खामकर हे 21 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून एकूण 43 विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणारी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची ही एकमेव शाळा आहे. या भरीव यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री अजित पवार साहेब,शिक्षणाधिकारी माननीय श्री कुलकर्णी साहेब, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री नागनाथ शिंदे साहेब, उपशिक्षणाधिकारी श्री हिरालाल कराड साहेब,गटविकास अधिकारी श्री जाधव साहेब,गटशिक्षणाधिकारी श्री पिकवणे साहेब,श्री बोंदार्डे साहेब, विस्तार अधिकारी श्री रामचंद्र सुळे साहेब , मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सचिन पवार, पत्रकार चंद्रकांत पवार, पत्रकार बबनराव उकांडे, पत्रकार भाऊसाहेब पवार, केंद्रप्रमुख श्री.कदम सर, केंद्रीय मुख्याध्यापक श्री. शहाजी येवले सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जरे या सर्वांनी जरेवाडी शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचे अभिनंदन केले आहे.
★शिक्षकांच्या एकत्रित मेहनतीचे हे फळ!
2002/23 यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचे 43, नवोदयसाठी एक आणि एन.एम. एम.एस. परीक्षेत 17 तसेच सारथी शिष्यवृत्तीसाठी 28 असे एकूण 89 विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून जिल्ह्यात सर्वाधिक यश मिळवले आहे. जरेवाडी शाळेतील सर्व शिक्षकांच्या एकत्रित मेहनतीचे हे फळ असून, यशामध्ये मिळणारे सातत्य सर्वांना आनंद देणारे आणि अभिमानास्पद आहे. पालक आणि विद्यार्थी यांनी दिलेला प्रतिसाद यासाठी संपूर्ण टीमचे मी कौतुक करतो.
– गोविंद कदम
मुख्याध्यापक जि.प शाळा जरेवाडी ता.पाटोदा जि.बीड.