★बळीराजाची चोहोबाजूंनी कोंडी – डॉ.गणेश ढवळे
पाटोदा | प्रतिनिधी
यावर्षी बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाअभावी पेरण्या खोळंबलेल्या आहेत तर काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत परंतु दुबार पेरणीची वेळ आली आहे. आधीच उशिरा पावसामुळे सोयाबिन पेरणीसाठी ऊशीर झालेला असतानाच पावसाने दडी मारल्याने व निकृष्ट बियाण्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले असुन सोयाबीन न उगवल्याने एकरी ५००० रुपये भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे खंडु वाणी, सतिश घोलप, रामहरी वाणी यांनी सांगितले.परीसरातील ३०-३४ शेतकऱ्यांवर दुबार सोयाबीन पेरणीची वेळ आली आहे.
★चोहोबाजूंनी बळीराजाची कोंडी – डॉ.गणेश ढवळे
दुबार पेरणीच्या संभाव्य संकटास केवळ पावसाचा विलंब ईतकेच एकमेव कारण नाही तर शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेले बोगस बियाणे,खतांचा काळाबाजार, घटलेली पाण्याची पातळी,खतांची कमतरता,अपुरे भांडवल आदि सर्वच स्तरातून बळीराजाची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.