★विनयभंग केल्याप्रकरणी चंदननगर ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील खराडी परिसरात राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीचे एक इंस्टाग्राम खाते बनवून डीपीवर संबंधित तरुणीचा फोटो ठेवून तिचे बनावट चॅटिंग बनवून इंस्टाग्रामवर इतरांना पाठवले. तसेच सदर फोटोचा गैरवापर करून तरुणीबाबत आक्षेपार्ह माहिती प्रसारित करून, तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीवर चंदननगर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच आयटीआयनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित तरुणीने पोलिसांकडे आरोपी हर्ष मौर्या (राहणार- वाराणसी, उत्तर प्रदेश )या आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार २०/६/२०२३ ते आत्तापर्यंत घडलेला आहे .आरोपीने संबंधित पीडित तरुणीच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. त्यानंतर संबंधित तरुणी व तिची बहीण यांचा फोटो ‘विकत घ्या ‘असा फोटो टाकून त्याखाली तक्रारदार हिच्या बहिणीचा मोबाईल क्रमांक मेसेज टाकून तिची बदनामी केली. तसेच तक्रारदार व तिच्या बहिणीच्या व्हाट्सअपवर कोणाचे तरी न्यूड फोटो दाखवून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न करून ‘ तुम्ही केस केली तर तुम्हाला आणखी त्रास देणार ‘अशा प्रकारची धमकी आरोपींनी दिली. त्यामुळे याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक गुन्हे एस पाटील पुढील तपास करत आहेत.
★स्नॅपचॅट वर प्रतिसाद न देणाऱ्या मुलीचा विनयभंग
एक १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी ही हर्षल सुलवादी (राहणार -खडकी ,पुणे )या आरोपीस स्नॅपचॅटवर कोणताही प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे संबंधित आरोपीने मुलीचा पाठलाग करून, तिची बॅग पकडून तिला जवळ घेऊन,’ तू माझ्यासोबत चल नाहीतर, तुला तुझ्या कुटुंबाच्या समोर उचलून घेऊन जाईल’ असे म्हणून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. याप्रकरणी आरोपी हर्षल सुलवदे याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे.