कुसळंबची कन्या पल्लवी कुमरे भूमीअभिलेखच्या लेखपाल पदी नियुक्त!
★ पल्लवी कुमरे चा कुसळंब ग्रामस्थांकडून सत्कार!
कुसळंब / प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील पल्लवी श्रीराम कुमरे हिची हिंगोली तालुका वसमत च्या भूमीअभिलेख लेखपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल कुसळंब ग्रामस्थांकडून सत्कार सोहळा करण्यात आला..
आट्ठेगाव पुठ्ठ्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांमध्ये अधिकारी होण्याची रेलचेल सुरू झाली आहे. नुकत्याच एमपीएससी मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी गगनभरारी घेतली आहे तर पोलीस मध्ये सुद्धा अनेक मुलींनी व मुलांनी झेप घेऊन करिअरची सुरुवात केली आहे, तर कुसळंब येथील पल्लवी कुमरे हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या भूमीअभिलेखच्या लेखपाल पदी झेप घेत आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.. तिच्या ह्या कार्याबद्दल कुसळंब ग्रामस्थांकडून तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली असून कुसळंब येथे तिचा सत्कार समारंभ घेण्यात आला.. यावेळी कुसळंब ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, व्यापारी, सर्व पक्षाचे पदाधिकारी,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
★कुसळंब सह अट्ठेगाव पुठयातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कुसळंबकरांची नेहमीच कौतुकाची थाप!
अट्ठेगाव पुठयातील विद्यार्थ्यांनी चांगल्या पदावर झेप घेऊन त्यांच्या करिअरची सुरुवात करावी यासाठी नेहमीच कुसळंब ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम केले गेले आहे सावरगाव, मुगगाव, चिखली, चिंचोली, कुसळंब सह इतर गावातील अनेक विद्यार्थ्यांनी अधिकारी पदापर्यंत झेप घेतली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा कुसळंब ग्रामस्थांकडून सन्मान देखील करण्यात आला आहे. यापुढे देखील असा सन्मान ग्रामस्थांना करण्यात ची इच्छा आहे, यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घ्यावी अशीच ग्रामस्थांची सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे…