5.4 C
New York
Saturday, April 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

दुचाकी चोरास आष्टी पोलिसांकडुन अटक

दुचाकी चोरास आष्टी पोलिसांकडुन अटक!

आष्टी | प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात दुचाकी वाहनांची चोरी करुन विक्री करणारा आरोपी वैभव उर्फ बाबासाहेब सुरोडे वय-२५ (रा. मातवळी ) यास आष्टी पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्याकडून महागड्या दोन दुचाकी हस्तगत केल्याची माहिती पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांनी दैनिक झुंजारनेताशी बोलताना दिली.याबाबत अधिक माहिती अशी की,मागील महिन्यात कडा येथील राहूल बलदोटा यांची होंडा कंपनीची (एमएच-२३-बी.ए.-५३१५) या क्रमांची अक्टीवा दि. ८ जुन २०२३ रोजी मध्यरात्री घरासमोरुन चोरीला गेली होती. याबाबत बलदोटा यांच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलिसांत गु.र.नं. २५३ कलम ३७९ भादंवी अन्वये दुचाकी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर,पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. अजीत चाटे, पो.हे.काॅ. रविराज निमसे,पो.ना. हनुमंत बांगर, पो.ना. जाधव, पो.शि. मजहर सय्यद, पो.शि.तांबे, पो.शि. वाणी या पथकाने तपास करून आरोपी वैभव उर्फ बाबासाहेब सुरोडे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने या गुन्ह्यात चोरी केलेली
ग्रे रंगाची होंडा कंपनीची अक्टीवा आणि काळ्या रंगाची स्कुटर चोरी करून आरोपीने मातकुळी येथील लक्ष्मीआईचा मळा येथे घरासमोर लावली असल्याची गोपनीय खबर आष्टी पोलिसांना मिळाळी.तसा तपास करुन आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेऊन अटक केले. नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांनी दोन दिवसांपुर्वी चोरीच्या सहा बुलेट आणि दोन ट्रॅक्टर असा २४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींसह हस्तगत केला होता.हा आरोपी हा जामिनावर सुटल्यानंतर आष्टी पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन इतर गुन्ह्याची उकल केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!