5.9 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

विहिरीच्या मंजुरीसाठी ७० हजारांची लाच घेताना तरनळीचा सरपंच एसीबीच्या जाळ्यात

विहिरीच्या मंजुरीसाठी ७० हजारांची लाच घेताना तरनळीचा सरपंच एसीबीच्या जाळ्यात

बीड | प्रतिनिधी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींच्या फाईलवर गटविकास अधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठांच्या सह्या घेऊन कार्यारंभ आदेश मिळवून देण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना तरनळीच्या सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी सायंकाळी केज पंचायत समितीच्या पाठीमागील एका खोलीत ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

महादेव प्रताप खेडकर (वय ३५, रा. तरनळी, ता. केज, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांच्या शेतजमिनीत नरेगा योजनेतून जलसिंचन विहीर मंजूर झाली होती. या विहिरींच्या प्रस्तावावर गटविकास अधिकारी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मंजुरी मिळवून देण्यासाठी आरोपी खेडकर याने प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

या संदर्भात २३ डिसेंबर २०२५ रोजी तक्रार प्राप्त झाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २३ आणि २४ डिसेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, सरपंच खेडकर यांनी तक्रारदाराकडून १० हजार आणि उर्वरित तिघांकडून प्रत्येकी २० हजार असे एकूण ७० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. १ जानेवारी २०२६ रोजी पहिली सापळा कारवाई करण्यात आली होती, मात्र त्यावेळी आरोपीने रक्कम स्वीकारली नाही. अखेर १३ जानेवारी रोजी केज पंचायत समितीच्या पाठीमागे असलेल्या स्वतःच्या खोलीत ७० हजार रुपये घेताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!