राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट अबॅकस टीचर’ पुरस्काराने सौ.अर्चना पवार यांचा गौरव!
★जामखेड येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान!
पाटोदा | प्रतिनिधी

ग्लोबल व्हिजन फाउंडेशन, पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘बेस्ट अबॅकस टीचर’ पुरस्काराने सौ. अर्चना पवार यांना सन्मानित करण्यात आले. दि. 11 जानेवारी 2026 रोजी जामखेड जि. अहील्यानगर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, सिने अभिनेते बाळू वाळुंजकर, ॲड. महेश वारे, मा.प्रा. मधुकर राळेभात (माजी जि.प.सदस्य), अमोल तातेड (जिल्हाध्यक्ष, भारतीय जैन संघटना – अहिल्यानगर), मा.प्रा.धनंजय भोसले (संचालक, मॅथ वर्ल्ड क्लासेस) तसेच श्रीमती सोनिया कौर (प्राचार्य) मा डॉ अभिलाषा भुजबळ आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.अबॅकस शिक्षणपद्धतीद्वारे विद्यार्थ्यांची गणितीय क्षमता, एकाग्रता, स्मरणशक्ती व गणनागती वाढवण्यासाठी सौ. अर्चना पवार गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मानसिक गणितात प्राविण्य मिळवत शालेय परीक्षांसह विविध तालुका, जिल्हा व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण प्रगती, आत्मविश्वासात झालेली वाढ तसेच गणिताविषयीची भीती दूर करण्यासाठी केलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल जिल्हा, तालुका व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तसेच इन्स्पायर अबॅकस अकॅडमीच्या संचालिका अर्चना शेळके व दादासाहेब शेळके यांनीही सौ. अर्चना पवार यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.


