फोटोचा अर्थ ; काहीतरी सत्यच!
सोशल मीडियाच्या माध्यमातून हा फोटो चांगलाच वायरल होत आहे. या फोटोत अर्धा भाग प्राण्याचा अर्धा भाग मनुष्याचा दाखवून हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यातून काय सांगण्याचा प्रयत्न होत आहे हे अद्याप कळले नाही. पण हा फोटो ज्यांनी कोणी बनवला आहे त्यांचं कौतुकच करावं लागेल.. कारण की असे विदूषक चित्र सध्या सोशल मीडियावर आणि मीडियासमोर पाहायला मिळत आहेत.. लायकी नसलेली भाषा, लायकी नसलेले हावभाव, पिसाळलेल्या कुत्र्यासारखा आवाज, शून्य विचार कशाचा कशाला ताळमेळ नाही तरीही न्यूज चैनल वाले अशा विचित्र चित्राला महत्व का देत असतील बरं… असो तो त्यांचा भाग पण याने समाजामध्ये दूषित वातावरण होत आहे हेही तितकेच समजून घ्यायला हवं… मीडिया हा चौथा आधारस्तंभ म्हणून पाहिला जातो परंतु सध्या आधार सोडा निराधारासारखं वागताना मीडिया दिसत आहे… ज्याची लायकीच नाहीये त्यांना का बर महत्व देत असतील… महत्त्वाच्या गोष्टी बाजूला सारून विचित्र प्राणी मीडियावर दाखवून मीडियाला काय सिद्ध करायचं आहे बरं… आमच्या वृत्तपत्राची भाषा थोडी आज विचित्र वाटत असेल परंतु समाजात वातावरण खराब करणारे विचित्र प्राण्यासारखे हवाभाव करत विचित्र तोंड मीडियावर दिसले की आमची लेखणीही भाषा तितकीच धारदार होते बर… आमचे जे वाचक असतील खरे त्यांनी घ्यावे बरे.. ज्यांना आमची लेखणी वाटेल वाईट ते आमचे वाचक कसले बरे… शेवटी सर्वांना सांगतो खरे.. आम्ही आज जे लिहिले आहे खरे तेच आहे बरे….
– प्रा.सचिन पवार
संपादक : दिव्य वास्तव