★पाटोद्याचे भुमिपुत्र डॉ.अभिषेक जाधव यांनी पत्रकार आरोग्य शिबिरातून केले जनतेला आव्हान
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा देशातील पत्रकारांची सर्वात मोठी आणि सर्वात जुनी पत्रकार संघटना असलेली मराठी पत्रकार परिषद 86 व्या वर्धापनदिनानिमित्त मराठी पत्रकार परिषदेचे विश्वत एस.एम.देशमुख,बीड जिल्हा अध्यक्ष विशाल सांळुखे, यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा मराठी पत्रकार परिषदेचे वतीने पत्रकारांचे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालय पाटोदा येथे मोफत आरोग्य तपासणी, इसीजी, रक्त तपासणी, दंत चिकित्सा, डायबीटीस तपासणी, शिबीरात करण्यात आली. या शिबीराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक अभिषेक जाधव, मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष अजय जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.तांदळे, डॉ.ओमासे, जेष्ठ पत्रकार इद्रीस चाऊस, दयानंद सोनवणे, एल,आर जाधव, मराठी पत्रकार परिषदे हल्ला कृती समिती अध्यक्ष संजय सानप, सचिन पवार, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष सोमनाथ खंडागळे, सचिव हमीदखाॅन पठाण, उपाध्यक्ष जावेद शेख, अशोक भवर, अनिल गायकवाड, शहराध्यक्ष फय्याज सय्यद, कोषाध्यक्ष दत्ता देशमाने, नाना डिडुळ, सतिश गर्जे, पदाधिकारी, सदस्य, नागरिक आदी उपस्थित होते.
★सिजर, हरणीया आदीवर आदीवर यशस्वी शस्त्रक्रिया -डॉ. जाधव
कौतुकास्पद उपक्रमा विषयी आपले मनोगत व्यक्त करतांना भुमिपुत्र डॉ.अभिषेक जाधव म्हणाले की लोकशाहीचा चौथा स्तंभ असेलेल्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेतलीच आहे. परंतु मी रूजू झाल्यापासून हरणीया, मुळव्याध, सिजर, आदी शस्त्रक्रिया होत असुन लवकर लेझर शस्त्रक्रिया सुरू होणार असल्याने रुग्णांना सर्व सुविधा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असुन पिडीत रुग्णांनी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ.अभिषेक जाधव यांनी केले..