साहेब सोबतीला…महाविकास आघाडीचा पक्ष आहे अख्खा!
★देशाचा वस्ताद महेबूब भाईसाठी आष्टीच्या मैदानात!
★तुतारी चा आवाज निघू लागला जोरात, बाकी सगळे कोमात
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी , पाटोदा , शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेबुब शेख यांनी मतदार संघ पिंजुन काढला आहे. मतदारांशी संवाद साधत आहेत.मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी आपल्या भागात उद्योग धंद्याच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी सर्व ग्रामस्थांनी आपला मतदानाचा बहमूल्य हक्क बजावण्याचे आवाहन महेबुब शेख यांनी केले. आष्टी – पाटोदा – शिरूर मतदार संघाच्या शास्वत विकासासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने मला निवडून द्या असे आवाहनही महेबुब शेख यांनी केले . दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दि . ९ नोव्हेंबर २०२४ रोजी आष्टी येथे जाहीर सभा घेणार आहेत.आष्टी येथील इदगाह मैदानावर ९ तारखेला दुपारी ३ वाजता ही सभा होणार आहे . आता स्वतः पवार साहेब वस्ताद म्हणून महेबुब भाईच्या विजयासाठी मैदानात उतरत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत . महेबुब भाईंचा मतदार संघात असलेला दांडगा जनसंपर्क , विकास करण्याची धमक आणि वस्ताद यांचा पाठीवर असलेला हात यामुळे आता महेबुब भाईंच्या विजयाचा गुलाल उधळू असा इरादा कार्यकत्यांनी पक्का केला आहे . केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, कांग्रेससह मित्रपक्ष महाविकास आघाडी म्हणून महेबुब भाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
★वस्ताद आज आष्टीत !
महेबुब शेख यांच्या विजयासाठी आता सर्वांचे वस्ताद असलेले पवार साहेब स्वतः मैदानात उतरले आहेत. आष्टीत येवुन अनेक दिग्गज पैलवानांना ते आसमान दाखवतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. दि .९ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ०३.०० वा . ईदगाह मैदान आष्टी.
★आष्टीत वाजणार तुतारी
आष्टी विधानसभा मतदारसंघात तुतारीचा जोर वाढल्याने विरोधकांची धांदल उडाली आहे. आष्टीत परिवर्तन होणार असं चित्र सध्या दिसत आहे. जनतेने म्हणाव घेतल्यास परिवर्तन नक्कीच होईल यात शंका नाही. खासदारकी प्रमाण आमदारकीतही बदल घडणार असे चिन्ह दिसत आहे.