14.7 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रचाराचा आज शुभारंभ, सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा : मा.आ.- भिमराव धोंडे

प्रचाराचा आज शुभारंभ, सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा : मा.आ.- भिमराव धोंडे

आष्टी | प्रतिनिधी

आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. आज बुधवारी दिनांक ६ नोव्हेंबर रोजी आष्टी येथे प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे तरी मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी प्रचंड संख्येने या जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आ. भीमराव धोंडे यांनी केले आहे.
प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने आष्टी येथील आण्णाभाऊ साठे चौक, लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनिमंदीर, कमानवेस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर चौक, महात्मा फुले चौकातून बाजारतळ अशी रॅली काढण्यात येणार आहे. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा होणार आहे. मी २० वर्षे आमदार असताना आष्टी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी कधीही जातीयवाद केला नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकास कामे केली आहेत.
सुरुवातीला १५ वर्षं आणि २०१४ ते २०१९ असे पाच मिळून वीस वर्षे मतदारसंघाचे नेतृत्व करीत मतदारसंघासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आणून विकास केला आहे. मतदारसंघातील एकही गाव असे नाही की, त्या गावांसाठी निधी दिलेला नाही. विकासकामे करताना कधीही भेद केला नाही. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून गावागावात शाळा सुरू केल्या आहेत. ऊसतोड मजूर, शेतमजूर, शेतकरी, कष्टकऱ्यांची मुले, मुली शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय करीत आहेत. प्रचाराचा शुभारंभ आज आष्टी येथे होत आहे तरी मतदारसंघातील बंधू व भगिनींनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अपक्ष उमेदवार माजी आ. भीमराव धोंडे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!