आमदार बाळासाहेब आजबे यांचा निर्णय काय ?
आमदार तर आपणच होणार काका तुम्ही चला लढा आम्ही आहोत ; जनतेचा आग्रह!
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी विधानसभेच्या निवडणुकीत चांगलीच रंगात आली आहे. विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे तिकीट कापल्याने जनतेमध्ये चांगलाच रोष वाढला असून आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी निवडणूक लढवावी आमदार तर आपणच होणार असा विश्वास जनतेतून येत आहे. आमदार बाळासाहेब आजबे आज 29 रोजी अर्ज दाखल करणार आहेत. आता बाळासाहेब आजबे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आमदारकी आपलीच असा जनतेचा विश्वास असल्याने बाळासाहेब आजबे काकांनी देखील जनतेच्या आग्रहाचा सन्मान करत आमदारकीचा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहा आपण आमदारकीसाठी अपक्ष लढणार आहोत असे आवाहन केले. आजबे यांचा आमदारकीचा पाच वर्षाचा कार्यकाळ जनतेला आपुलकीचा विश्वासाचा हक्काचा आणि विकासाचा वाटल्याने पुन्हा आजबेज आमदार व्हावेत अशी जनभावना निर्माण झाली आहे. पक्षाने जरी नाकारले पण जनतेने आता तारण्याचं ठरवलं असल्याने बाळासाहेब आजबे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं जाहीर केला आहे.
★स्वाभिमान-विश्वास-विकास म्हणजेच बाळासाहेब आजबे
गेल्या पाच वर्षाच्या कार्य काळामध्ये स्वाभिमानाने जगायचं शिकवलं विश्वासाने सोबत राहायचं शिकवलं आणि विकासाने जनतेची प्रगती करायला शिकवलं याच ब्रीद वाक्यावर जनतेने पुन्हा बाळासाहेब आजबे यांना निवडून द्यायचं ठरवलं आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बाळासाहेब आजबे आणि जनतेची भावना राखली असून जनतेने आता बाळासाहेब आजबे यांना आमदार करून त्यांचा मान सन्मान वाढवायचा आहे, असं ठरवलं आहे..