★लोकनेते सुरेश आण्णा धस यांच्या विजयासाठी रात्रंदिवस एक करणार
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकनेते सुरेश आण्णा धस यांना जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला तर काही शिलेदारांचा तर आनंद गगनातच मावेना असा होता. सुरेश आण्णा धस यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी सर्वात जास्त उत्साही आणि नागरिकांच लक्ष केंद्रित केले असे संजय खोटे यांनी सगळ्यात जास्त उत्साही कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे सगळेच पाहत होते आणि त्यांचा उत्साह पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना असा झाला होता.
सुरेश आण्णा धस यांचा सच्चा शिलेदार म्हणून संजय खोटे यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज ते साक्षात सर्व जनतेनेच पाहिलं. आष्टी येथे सुरेश आण्णा धस यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले हजारो नागरिक यांचं लक्ष फक्त संजय खोटे यांच्याकडे होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद उत्साह पाहिल्यानंतर येणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच संकल्प झाला असेल तो म्हणजे अण्णाला आमदार करण्याचा कारण की संजय खोटे यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि तो उत्साह पाहिल्यानंतर सर्वांनाच वाटलं असेल की हा खरंच अन्नाचा सच्चा शिलेदार असेल. एकंदरीत संजय खोटे यांनी आलेल्या हजारो बांधवांचे लक्ष केंद्रित केले होते. आणि त्यांच्या भावना अन्नाला आमदार करण्यासाठी आपणही तितक्याच उत्साहाने काम करा अशाच बोलक्या प्रतीच्या होत्या…
★संजय खोटे यांच्या उत्साहाने हजारो नागरिकांचे लक्ष केले केंद्रित!
लोकनेते सुरेश आण्णा धस यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या हजारो नागरिकांचे लक्ष संजय खोटे यांनी केंद्रित केले त्यांचा उत्साह यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहिल्यानंतर सर्वांनाच त्यांच्याकडे पाहण्याचा फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. अण्णाला उमेदवारी मिळाली आता आमदार होणार हाच उत्साह त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून आणि चेहऱ्यावरील हावभावांमधून पाहायला मिळत होता. अण्णा आमदार होणार आपण जोराने काम करा असाच त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव होता…