राष्ट्रवादीकडून आमदार बाळासाहेब आजबेंना पुन्हा संधी!
★राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाकडून आमदार आजबेंना पहिल्या यादीत स्थान!
आष्टी | प्रतिनिधी
महायुतीच्या तीनही पक्षाकडून पहिल्या याद्या जाहीर करण्यात आले आहेत भारतीय जनता पार्टी कडून 90 उमेदवारांची यादी जाहीर केली असून राष्ट्रवादीकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीमध्ये आष्टी मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना पुन्हा संधी मिळाली आहे.
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेमध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार भीमराव धोंडे सुरेश आण्णा धस हे इच्छुक होते परंतु महायुतीच्या फार्मूल्यानुसार विद्यमान आमदारांचे एकही तिकीट कट होणार नसल्याचं अजित दादांनी जाहीर केलं होतं आणि त्याच प्रमाणे आष्टी मतदार संघातून विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने धस आणि धोंडे काय करणार याकडे आता लक्ष लागले आहे. महायुतीच्या घटक पक्षाच्या उमेदवाराला मदत करणार का अपक्ष राहून निवडणूक लढवणार ? हे पहावं लागणार आहे. आमदार बाळासाहेब आजबे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आष्टी मतदार संघामध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. ” आमचं ठरलं ” पुन्हा आम्हीच! असं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
★आष्टीची उमेदवारी काकांनाच!
महायुतीकडून आष्टी विधानसभेची उमेदवारी विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. आमचं ठरलं! पुन्हा आम्हीच! असे हॅशटॅग देऊन जोरदार प्रचार सुरू झाला आहे.