★महिला उमेदवारा निवडीसाठी विचार करण्याचे आदेश
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील प्राथमिक शाळेमध्ये मुख्यमंत्री युवा कार्यक्रम ट्रेनी शिक्षक निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती या प्रक्रियेमध्ये शासन निर्णयातील युवा या शब्दामुळे व वरिष्ठांच्या फोन संदेशद्वारे युवा याचा अर्थ पुरुष होतो असा अर्थ लावून सदरील प्रक्रियेमध्ये अर्ज केलेल्या ऐश्वर्या मकरध्वज शिंदे यांची निवड रद्द करून सदरील प्रक्रियेमध्ये पुरुष उमेदवार गणेश शेषराव सानप यांची निवड करण्यात आली होती सदरील महिला उमेदवार ऐश्वर्या मकरध्वज शिंदे यांनी वरील भेदभावविरुद्ध मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ मध्ये ॲड. नरसिंह जाधव यांच्या मार्फत रिट याचिका क्रमांक १०३१४/२०२४ दाखल केली होती व सदरील याचिकेमध्ये भारतीय राज्यघटनेने दिलेल्या समानतेच्या तत्वाला बाधा येऊन पुरुष व महिला असा भेदभाव करून समान संधीच्या अधिकाराची अवहेलना केली आहे व महिला म्हणून निवड प्रक्रियेमधून बाद करणे हे घटनाबाह्य असल्याचे नमूद करून वरील निवड रद्द करून ऐश्वर्या शिंदे यांना वरील निवड प्रक्रियेमध्ये सामील करून घ्यावे अशी विनंती करणाऱ्या याचिका केची सुनावणी दिनांक ०७/१०/२०२४ रोजी झाली असता मा. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी व ए.जी. चपळगावकर यांच्या पुढे झाली असता न्यायालयाने जिल्हा परिषद चे वकील यांना वरील भेदभाव संदर्भामध्ये विचारणा केली असता जिल्हा परिषदेचे वकील ॲड. प्रशांत डी. सूर्यवंशी यांनी असली प्रक्रिया रद्द केल्याची व गणेश शेषराव सानप यांची निवड रद्द केल्याचे व न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यानंतर मा. उच्च न्यायालयाने वरील दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून ऐश्वर्या शिंदे यांची याचिका मंजूर करून सदरील महिलेला सदरील निवडक प्रक्रियेमध्ये विचारात घेऊन निर्णय घ्यावा असे आदेश दिले.याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. नरसिंह जाधव यांनी काम पहिले त्यांना ॲड. राकेश ब्राह्मणकर ॲड. रवींद्र वानखेडे, ॲड. सोनाली गणेश सोमवंशी व ॲड. गौरव एस. खांडे यांनी सहकार्य केले. तसेच शासनाच्या वतीने ॲड.आर.पी. गौर तर जिल्हा परिषदच्या वतीने ॲड. पि.डी. सूर्यवंशी यांनी काम पहिले.