★विद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा तालुक्यातील जय भवानी शिक्षण प्रसार मंडळ गेवराई संचलित कला व विज्ञान महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॉक) ने बी ग्रेड प्रदान केला याबद्दल सर्व स्तरातून महाविद्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सप्टेंबर महिन्यात 10,11 या दिवशी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या त्रिसदस्य समितीने जय भवानी महाविद्यालयात भेट देऊन विद्यालयाचे वस्तुनिष्ठ गुणवत्ता मूल्यांकन केले होते. सदर समितीच्या मूल्यांकन अहवालाद्वारे नॉकने महाविद्यालयास बी ग्रेड प्राप्त झाला असल्याची आपल्या वेबसाईट वरून घोषणा केली. जय भवानी महाविद्यालयास बी हा ग्रेट प्राप्त झाला असल्याचे वृत्त पाटोदा शहर व परिसरात पसरतात अनेक मान्यवरांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विश्वास कदम यांचे भ्रमणध्वरीवरून अभिनंदन केलेत तर अनेक मान्यवरांनी विद्यालयात जाऊन त्यांचा सन्मान केला. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॉक) यांच्या त्रिस्तरीय समितीमध्ये अध्यक्ष म्हणून माजी कुलगुरू प्रो. डॉ. यमोहम्मद इस्तियाक, जामिया मिकीया इसमिया नोएडा उत्तर प्रदेश, सदस्य समन्वयक प्रो.डॉ.राजेंद्र शनमुगन अर्थशास्त्र विभाग, गांधीग्राम ग्रामीण संस्था गांधीग्राम तामिळनाडू, प्रो.डॉ.टी.एम. जोसेफ माझी प्राचार्य निर्मला विद्यालय कोटम केरळ यांचा सदस्य म्हणून समावेश होता. प्राचार्य डॉ.विश्वास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मूल्यांकन प्रक्रियेसाठी समन्वयक म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख विनोद किर्दक यांनी काम बघितले. ग्रामीण भागातील जय भवानी विद्यालयाने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल युवा नेता राहुल बामदळे व अशोक बामदले यांच्यासह पाटोदा तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर यांनी प्राचार्य डॉ.विश्वास कदम व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
★हे यश सर्व प्राध्यापकांच्या परिश्रमाचे
कोणताही यश प्राप्त करण्यासाठी सर्वांचं एकत्रित कार्य महत्त्वाचा असतं तेच सर्व कार्य त्याला यातील प्राध्यापकांनी केल्याने हे यश प्राप्त झाले आहे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी या मूल्यांकनासाठी प्रचंड परिश्रम घेतले होते याच परिश्रमाचे हे फळ मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉ.विश्वास कदम यांनी व्यक्त केली आहे.