★41 रक्तदात्यांनी आपले बहुमूल्य असे रक्तदान केले
सौताडा | प्रतिनिधी
सौताडा येथील वीर राजे ग्रुप यांचा गणेशोत्सव मंडळाकडून भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक होतकरू रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान शिबिरामध्ये आपले रक्तदान केले. एकूण 41 रक्तदात्यांनी आपले बहुमूल्य असे रक्तदान केले .दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रसिद्ध असलेले वीर राजे ग्रुप यांच्या गणेशोत्सव मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांपैकी हा रक्तदानाचा उपक्रम हा अतिशय स्तुत्य असून ज्या वेळी एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो व त्याला रक्ताची अत्यंत गरज भासते त्यावेळी रक्त हे जीवनदान म्हणून रक्ताची गरज म्हणजे एक प्रकारचं वरदान ठरते, हे सामाजिक भान ठेवून मंडळाचे क्रियाशील कार्यकर्ते अर्जुन भोरे ,विशाल कुमटकर, बबलू टेकाळे, पांडू टेकाळे, सागर टेकाळे, बाबू शिंदे, भाऊ शिंदे, सुग्रीव टेकाळे, बाबू टेकाळे, व्यंकटेश टेकाळे, राम शिंदे, अमोल शिंदे, संतोष शिंदे, जीवन टेकाळे, सोमीनाथ कुमटकर, दत्तात्रय टेकाळे,विशाल शिंदे , अशोक टेकाळे,सतिष शिंदे , प्रकाश सानप ,अशोक रामहारी टेकाळे,पिंटू सानप ,विजय शिंदे ,परसु शिंदे आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला .सर्व स्तरातून या कार्यक्रमाचे चांगला समाज उपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल सौताडा ग्रामस्थांकडून वीर राजे ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे आभार मानण्यात आले ,याप्रसंगी 41 रक्तदात्यांनी रक्तदान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली व रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे हे बहुमूल्य संदेश या निमित्ताने दिला.