★अध्यात्मिक आणि वारकरी सांप्रदायाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल सत्कार
कुसळंब | प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने अध्यात्मिक आणि वारकरी आघाडीच्या नियुक्त्या नुकत्याच पार पडले यामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाच्या अध्यक्षपदी कुसळंब येथील हनुमंत अण्णा पवार यांची निवड करून कुसळंबकरांना दिलेला बहुमान अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. त्यांच्या निवडीबद्दल युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, अध्यात्मिक वारकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम व आत्ता प्रदेश उपाध्यक्ष ॲड.नरसिंह जाधव यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
रविवारी कुसळंब येथे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.नरसिंह जाधव यांनी आवर्जून उपस्थित राहून अध्यात्मिक आणि वारकरी आघाडीच्या आष्टी पाटोदा शिरूर अध्यक्षपदी हनुमंत अण्णा पवार यांची निवड झाल्याबद्दल सत्कार केला यावेळी पक्षाकडून दिलेली जबाबदारी अतिशय महत्त्वाची आणि मोलाचे असून त्याचा उपयोग धार्मिक क्षेत्रात सलग्न असणाऱ्या सर्व गोष्टीसाठी करावा त्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करू असा देखील त्या शब्द यावेळी दिला यावेळी सामाजिक कार्यकर्ते अबलूक घुगे, सुहास जाधव, श्रीहरी काका पवार यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक भजनी मंडळी वारकरी क्षेत्रातील मंडळी पत्रकार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.