16.9 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

वय वृद्ध आजी-आजोबांवर पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांचा अत्याचार!

★आजी आजोबाचा नातू जनसेवक गणेश कवडे धावला मदतीला!

पाटोदा | प्रतिनिधी

पाटोदा तालुक्यातील अनेक वय वृद्ध आजी-आजोबांचे पगार पोस्टातील मगरूर अधिकाऱ्यामुळे अडकले होते दहा पंधरा दिवसापासून आजी आजोबा या पोस्टमध्ये चकरा मारत होते एक अजि तर चक्क चक्कर येऊनच पडली तरी देखील अधिकाऱ्यांना काही फरक पडला नाही हे सर्व प्रकार जनसेवक गणेश कवडे यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी लागलीच संबंधितांना भेट घेऊन त्यांचे प्रश्न थेट खासदारांच्या कानावर घातले आणि खासदारांशी सर्वसामान्य जनतेचे बोलणं करून दिल खासदारांनी सकारात्मक भूमिका घेऊन अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या तर गणेश कवडे यांना त्या सर्वांचे पैसे मिळवून द्या असे आदेश देखील दिले.
आपल्या हक्काचे पगार मिळण्यासाठी अनेक दिवसापासून चक्र मारत असलेले आजी आजोबा आणि त्यांचे प्रश्न घेऊन जनसेवक गणेश कवडे तहसीलदाराच्या दारात गेले आणि जाब विचारला असता तहसीलदारांनी सर्वांचे पैसे आठ तारखेला तहसील मधून वर्ग झाले आहेत असं कळवलं मग पोस्टातील मगरूळ अधिकारीच सर्वसामान्यांना त्रास देतात का ? असा प्रश्न उपस्थित होतो. अशी माहिती कळताच गणेश कवडे यांनी सर्व आजी-आजोबांना अस्वस्थ केले आणि तुमचा पगार पोस्टात येऊन मी तुमचे खात्यावर टाकून घेतो असं सांगितले यावेळी जनसेवक गणेश कवडे व सामाजिक कार्यकर्ते चक्रपाणी जाधव यांच्यासह पाटोदा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

★सर्व वयोवृद्ध आजी-आजोबांना घेऊन गणेश कवडे तहसीलच्या दारात

वयोवृद्ध आजी-आजोबांचे पगार जाणून बुजून पोस्ट अधिकारी मगरुरपणा दाखवत चालढकल करत होता येणारे वयोवृद्ध नागरिक त्या मगरूर अधिकाऱ्या वैतागले होते सर्व आजी-आजोबांनी गणेश कवडे यांची भेट घेऊन हा विषय कानावर घातला लागलीच कवडे यांनी सर्वांना घेऊन तहसील कडे धाव घेतली आणि प्रशासनाला जाब विचारले प्रशासनाने सांगितले सर्व पैसे वर्ग केले आहेत पैसे भेटून जातील संबंधित अधिकाऱ्याला सूचना दिले असल्याचे देखील प्रशासनाकडून कळालं आहे.

★खासदार बजरंग सोनवणे यांनी फोनवरून लोकांच्या तक्रारी घेतल्या जाणून

बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पाटोदा येथील वय वृद्ध आजी आजोबांच्या तक्रारी फोनवरून जाणून घेतल्या. पाटोदा येथे अनेक वय वृद्ध आजी-आजोबांच्या पोस्ट ऑफिस अधिकाऱ्याकडून होत असलेल्या हेडसाळेची तक्रार जनसेवक गणेश कवडे यांच्या कानावर आली आणि त्या क्षणी खासदार साहेबांना फोन करून आजी-आजोबांशी थेट खासदारांचे बोलणं करून दिलं आणि हा प्रश्न मार्गी लावू काळजी करू नका असा विश्वास खासदार साहेबांनी दिला..

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!