★छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे विचार खऱ्या अर्थाने समाजात रुजू लागले
कुसळंब | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील आदर्श गाव कुसळंब येथे महापुरुषांच्या विचाराला अधिक महत्त्व दिले जात. नुकतीच एक ऑगस्ट रोजी कुसळंब येथे सार्वजनिक महापुरुषांचा महाउत्सव साजरा करण्यात आला यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची एकत्रित जयंती साजरी करून एकात्मतेचा संदेश कुसळंबकरांनी दिला आहे. इतर गावांनीही कुसळंबकरांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एकात्मतेचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले तर समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाहीत आणि सामाजिक एकोपा अधिक घट्ट होईल दृष्टीने पाऊल उचलून जयंती कार्यक्रम साजरे केले पाहिजेत हाच हेतू कुसळंबकरांचा आहे.
एक ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस असल्याने अधिक विशेष उपक्रम देखील राबवण्यात आले काही ठिकाणी वृक्षरोपण रक्तदान करून साजरा करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या तीनही महापुरुषांच्या जयंती निमित्त गोळा करण्यात आलेली वर्गणी मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते त्या वर्गणीचा हिशोब देखील सर्वांसमोर प्रसिद्ध करून नवीन आदर्श निर्माण केला आहे. येणाऱ्या काळात देखील सर्वच सार्वजनिक उत्सवाचे नियोजन अशा पद्धतीने प्रकाशित केलं तर पारदर्शकपणे उपक्रम राबवले आणि कार्यक्रम पार पडले असं होईल आणि सर्व समाज सर्वसामान्य नागरिक प्रत्येक उत्साहामध्ये कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवतील यातील मात्र शंका नाही. तीनही महापुरुषांच्या जयंती मध्ये सर्व समाजातील जाती धर्मातील नागरिक एकत्रित आले होते आणि त्यामधून नागरिकांमधील उत्साह एकता पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि येणाऱ्या काळात असाच एकोपा कायम राहील आणि विविध उपक्रम एकोप्याने होतील असेही सांगितले आहे.
★महापुरुषांची जयंती एकत्रित करून एकात्मतेचा संदेश
कुसळंब मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या महापुरुषांची जयंती एकत्रित साजरी करून सबंध जनतेला एकात्मतेचा संदेश दिला असून त्यांच्या विचाराचे अनुकरण सध्याच्या पिढीला अत्यंत महत्त्वाचे असून त्याचबरोबर आपण केलेलं कार्य जनतेसमोर असलं पाहिजे हा देखील मोलाचा संदेश वर्गणीचा हिशोब प्रसारित करून दिला आहे.
★महापुरुषांची विचारधारा जीवन मजबुतीचे शस्त्र!
शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ साठे ही विचारधारा मजबूत करण्याचं काम जयंतीच्या माध्यमातून आणि प्रबोधनाच्या वाणीतून रुजवत गेलतर अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती आपोआप आत्मसात होणार आहे.प्रस्थापित आणि धनदांडग्यांकडून गोरगरीबांना होणारी मारहाण, अन्याय, अत्याचार काही प्रमाणात कमी झाले ते फक्त महापुरुषांच्या विचारधारेमुळे आता समाजा-समाजामध्ये प्रत्येक महापुरुषांचे खरे विचार रुजले पाहिजेत त्यासाठी सर्व सुशिक्षित वर्गांचे मोलाचे योगदान ठरणार आहे. अन्यथा पुन्हा प्रस्थापित व्यवस्थेचे गुलाम व्हावे लागेल..
– अतुल शेलार
सामाजिक कार्यकर्ते कुसळंब.