★उठसूठ बेताल वक्तव्य करून राणेंनी वातावरण बिघडवू नये
पाटोदा | प्रतिनिधी
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांची देवाण घेवाण करणारे राज्य आहे या ठिकाणी अठरा पगडा जाती धर्म पंथाची लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत . मात्र नितेश राणे यांच्या सारख्या काही नेत्यांमुळे महाराष्ट्राचा सलोखा दुभंगत चालला आहे जाती जातीत तेढ निर्माण होईल अशी बेभान वादग्रस्त वक्तव्य करून नितेश राणे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहे आणि सारखेच अशी वक्तव्य करण्याची मालिका त्याची सुरूच आहे . हा सारखा सारखा मुस्लिम समाजाला केंद्र बिंदू ठेवत द्वेष पूर्ण भाषण देत असतो त्यामुळे नितेश राणे याला कायद्याचा धाक आहे का नाही हे प्रश्न निर्माण होत आहे रामगिरी महाराज च्या वक्तव्याने मुस्लिम समाजात प्रचंड रोष निर्माण झालेला असताना या रामगिरी महाराजा विरुद्ध काही बोलाल तर याद राखा असे चिथावनी देणारे वक्तव्य सारखेच होत आहे या मुळे मुस्लिम समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या जात आहेत कोणत्या ना कोणत्या कारणाने नितेश राणे मुस्लिम समाजा बद्दल गरळ ओकून मुस्लिम समाजाच्या भावनांना इजा पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे नितेश राणे यांच्या अश्या वक्तव्याने महाराष्ट्रात दोन जाती धर्मात तेढ निर्माण होत असल्याने याला वेळीच आवर घालने गरजेचे आहे, याची उंची किती आणि बोलतो किती याच भान या निलेश राणे ने करायला पाहिजे निलेश रानेत हिम्मत असेल तर महाराष्टातील एखाद्या मशिदे मध्ये घुसून दाखवावे , लव्ह जिहाद च्या नावाखाली मोर्चे काढून मुस्लिम समाजावर बेताल वक्तव्य करत आहे त्याला कोणता कायद्याची भीती ना,पोलिसा प्रशासनाच्या समोर तो गरड ओकतो आणि पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात याच्याच जागेवर जर मुस्लिम च एखादा पुढारी कीवा कार्यकर्ता असला असता तर त्याच्या विरोधात कार्यवाही होऊन जेल मध्ये टाकले असते , कायद्याची भीती राहिली नाही का असल्या वाचाळ विरा विरोधात कार्यवाही झालीच पाहिजे जेणे करून महाराष्ट्राचा सलोखा अबाधित राहण्यास मदत होईल . सर्वोच्च सभागृह मध्ये आमदारकीची शपथ घेता ना सर्व धर्माचा आदर करील. शपथ घेतली असताना एका विशिष्ट जातीवर बोलून घेतलेल्या शपथे च भंग केला असल्याने निलेश राणे ची आमदारकी रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदना द्वारे अॕड. जब्बार पठान यांनी कळवले आहे .