★पाटोदा सकल मुस्लिम समाजाची निवेदनाद्वारे मागणी
पाटोदा | प्रतिनिधी
आ.निलेश राणे यांची जीभ पुन्हा घसरली असुन मुस्लिम समाजा विषयी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत असुन पाटोदा मुस्लिम सकल समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री.अनमोल केदार यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला आ.राणेवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भाजपा आ.निलेश राणे हा नेहमी मुस्लीम समाजा बाबत नकारात्मक विधाने करीत आहे दि.१/९/२०२४ अहमदनगर येथे मुस्लिम समाजाच्या प्रेषितांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे रामगिरी महाराजांच्या समर्थनात आयोजित बैठकीत आ.निलेश राणे यांनी मुस्लीमांना मस्जीदमध्ये घुसून मारू असे वादग्रस्त विधानं केले असुन तसेच आ.निलेश राणे हे नेहमी मुस्लिम समाजा विरोधात वादग्रस्त व चिथावणीखोर वक्तव्य करत असतो त्याने विधानसभा समोर ठेवून हिंदु मुस्लीम दंगे घडवाण्याचे नियोजन दिसून येत आहे तरी आ.निलेश राणे व त्यांच्या कुटुंबाचा बंदोबस्त पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाने करावा नसता पाटोदा शहर मुस्लिम समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे म्हटले आहे.या निवेदनावर मोसिन शेख,जावेद शेख,मोहीद शेख,हमीदखान पठाण, भाई विष्णुपंत घोलप,वाजेद कुरेशी,आकिब शेख,शेख अराफत,असलम पठाण, माजेद पटेल,आयुब पठाण, शेख जमील,सय्यद लतिफ,शेख मसरूद्दीन,शेख खलिल,शेख सुलेमान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत…