★जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, चैतन्य महाराज, रामकृष्ण महाराज, पांडुरंग महाराज यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ सोहळा संपन्न
★वारकऱ्यांच्या हिताचे कामासाठी प्रधान्य देऊ – हनुमंत पवार
कुसळंब | प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीच्या नियुक्त्या नुकत्याच पुणे येथे संपन्न झालेल्या चला वारकरी या कार्यक्रमांमध्ये देण्यात आल्या होत्या. पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील हनुमंत नामदेव पवार यांना आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्त करून कुसळंबकरांच्या अभिमानात भर टाकली आहे, त्याबद्दल कुसळंबवासीयांकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे खूप खूप आभार व्यक्त केले असून रविवारी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी कदम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना कुसळंब मध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाच्या अध्यक्षपदी हनुमंत अण्णा पवार यांची नियुक्ती झाल्याने कुसळंब गावच्या अभिमानात भर पडली असून येणाऱ्या काळात धार्मिक वारकरी संप्रदायामध्ये जे काम करता येईल त्यासाठी अधिक जोमाने काम करू असे देखील या कार्यक्रमाप्रसंगी अण्णा यांनी सांगितले तर मान्यवरांनी अण्णांना शुभेच्छा देऊन आपल्या पदाचा उपयोग धर्मासाठी धर्माच्या हितासाठी वारकऱ्यांसाठी करावा असे या ठिकाणी मनोगत व्यक्त केले. तसेच जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांनी पक्षाच्या माध्यमातून धार्मिक सांप्रदायिक वारकऱ्यांसाठी जे शक्य होईल ते पक्षाच्या माध्यमातून करू असाही या ठिकाणी शब्द दिला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक भजनी मंडळी युवक वर्ग सर्वसामान्य नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
★ज्ञानोबा-तुकोबाचा विचार युवा पिढीत प्रसार करण्यासाठी आघाडी
सध्या कीर्तनकार कोणत्यातरी एखाद्या पक्षाची बाजू घेऊन त्यांच्या नेत्याचा प्रसार कीर्तनाच्या माध्यमातून केला जातोय परंतु खऱ्या अर्थानं ज्ञानोबा तुकोबांचा विचार प्रसारित करणे गरजेचे आहे आणि तो होताना कुठेच दिसत नसल्याने राष्ट्रवादी अध्यात्मिक आणि वारकरी आघाडीची स्थापना केली असून खऱ्या अर्थाने ज्ञानोबा तुकोबांचा विचार प्रसार करण्यासाठी आघाडी काम करेल आणि युवा पिढीला त्यांच्या विचारातून प्रेरित करेल यासाठीच ही आघाडी स्थापन केली आहे असेही पक्षांच्या नेत्याकडून सांगण्यात आले आहे.
★वारकरी भजनी मंडळीसाठी विशेष कार्य करू – प्रशांतजी कदम
राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी ही वारकऱ्यांसाठी आणि भजनी मंडळी भक्तांसाठी काम करणारी आघाडी आहे. आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे अध्यक्षपदी कुसळंबचे भूमिपुत्र हनुमंत नामदेव पवार यांची नियुक्ती करून या परिसराला विधानसभेला बळ देण्याचे काम केले असून येणाऱ्या काळात धार्मिक क्षेत्रातील सर्व कामे मार्गी लावण्यासाठी तसेच वारकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू..
– प्रशांतजी कदम
जिल्हाध्यक्ष : राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी बीड.