★संबंधितावर फसवणुकीची कारवाई करण्याची सहशिक्षक बाळासाहेब शिंदे यांची मागणी
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळाच्या खाते क्र. 62203685391 या खात्यावरील 10 लाख रू रक्कम होती त्यातून शाळेवर संबंधित कामासाठी वापर होणे आवश्यक असताना त्या रक्कमेचा खाजगी कामासाठी वापरण्यात आल्यानं संबंधितांवर फसवणूकीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सह शिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी मा.जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,मा.विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्या कडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जि.प.कें.प्रा.शाळेच्या खात्यावरून अशोक दशरथ कराड,अरुण सोनवणे, आरती उत्तम गर्जे,उत्तम दादाराव गर्जे यांना चेक देऊन उचलून घेतलेली आहे ही रक्कम कोणत्याही खाजगीकरणासाठी वापरता येत नसून ती रक्कम उचलून तत्कालीन मुख्याध्यापक उत्तम दादाराव गर्जे, शिक्षण विस्तार अधिकारी हनुमान गहिनीनाथ गव्हाणे,धनंजय बोंदार्डे व ऋषिकेश शेळके यांनी उचलून घेतलेली आहे. हे विस्तार अधिकारी एकमेकांशी संलग्न असून आलटून पलटून गटशिक्षणाधिकारी या पदाचा पदभार घेऊन या खात्यावरून सर्व रक्कम उचलून घेऊन त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. यांच्यावरती भारतीय दंड विभाग ३०७ सारखे कलमा अंतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल आहेत या खात्यावरून तब्बल दहा लाख रुपये उचलून घेऊन भ्रष्टाचार केलेला आहे.तसेच सहशिक्षक शिवदास ज्ञानोबा सुरवसे यांचे पगार उचलून घेऊन त्यांना पगार दिलेले नाही. गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुंबळी येथील शालेय व्यवस्थापन समिती सुद्धा स्थापन केलेली नाही. यांना वेळोवेळी सांगून सूचना देऊन सुद्धा यांनी शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केलेली नाही. सर्व भ्रष्टाचाऱ्यांची चौकशी करून भारतीय दंड विभाग नुसार 420 चे गुन्हे दाखल करून यांना कायमस्वरूपी बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली आहे.