धाकदडशाही भ्रष्टाचारी राजवट येणार संपुष्टात – ॲड. नरसिंग जाधव
★पत्रकार परिषद घेऊन ॲड.जाधवने आष्टी मतदारसंघाच चित्र केले स्पष्ट
पाटोदा | प्रतिनिधी
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार आपापल्या परीने तयारी करताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामार्फत पाटोदा तालुक्यातून नरसिंह जाधव यांनी पक्षाकडे उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली असून काल पाटोदा येथे पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर माहिती दिली आहे आणि भविष्यात काय व्हायला पाहिजे या संदर्भातही पत्रकार परिषदेमध्ये आपलं मत व्यक्त केले आहे.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचा जवळपास बराचसा लेखाजोखा काल पत्रकार परिषदेमध्ये मांडला असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्याची गरज असून आत्तापर्यंत सत्ताधारी विरोधकांनी एकही मोठा प्रकल्प न आणल्यामुळे युवकांमध्ये बेरोजगारी वाढत चालली आहे त्याचबरोबर पाटोदा तालुक्याला 35 वर्षापासून एमआयडीसी साठी जागा उपलब्ध करून दिली आहे परंतु सध्या जागा काही विशिष्ट व्यक्तीने हडप केल्याचे समजते व छोट्या-मोठ्या उद्योग धंद्याला त्या ठिकाणी टाकण्यासाठी जागाच उपलब्ध नाही असा देखील आरोप त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. कडा येथील महेश सहकारी साखर कारखाना मोठी थकबाकी दाखवून बंद पडला आणि शेतकऱ्यांचे खूप मोठा नुकसान केलं रोजगारही गेला. तसेच कोणत्या तालुक्यामध्ये पाण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या हाल होतात विशेष करून पाटोदा शहराला फिल्टरची सोडा साधे पाणी देखील प्यायला मिळत नाही करोडो रुपयाचा निधी पाण्यासाठी येतो मग तो जातो कुठे असाही त्यांनी आरोप केला. मांजरा नदीवर लाखो रुपये खर्चून बांधलेला पूल पहिल्याच पावसात वाहून जातो हेच काम करून जनतेची फसवणूक करणारे हे सत्ताधारी विरोधक आज मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि जनतेला वेड्यात काढत आहेत हेच आपल्याला बंद करावा लागेल त्यामुळे आपणही निवडणुकीच्या तयारीला लागलो असून जनतेच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक राहून प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे देखील सांगितले. आष्टी मतदार संघाला उच्चशिक्षित डॉक्टर वकील प्राध्यापक पत्रकार अशा व्यक्तींची गरज आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेने देखील विचारपूर्वक मतदान करून आपला प्रतिनिधी योग्य उच्चशिक्षित असावा हीच भावना मनात ठेवून मतदान करावं असं ॲड.नरसिंह जाधव यांनी शेवटी आव्हान केले.
★कै.ॲड.लक्ष्मण जाधव यांची हयात पवार साहेबांसोबत आता
पाटोदा तालुक्यातील कै.ॲड.लक्ष्मण जाधव यांची संपूर्ण हयात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत गेली आता त्यांची पिढी देखील पवार कुटुंबीयांसोबत प्रामाणिकपणे काम करत असून आता त्यांच्या घराला न्याय मिळेल का अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून येत आहे.ॲड. नरसिंग जाधव हे संभाजीनगर येथील कोर्टामध्ये वकील असून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेत न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना ओळखलं जातं आता त्यांच्या रूपाने उमेदवार मिळाला तर अधिक हक्काचा उमेदवार ठरू शकतो असेही बोलले जात आहे.
★आष्टी मतदारसंघ भ्रष्टाचाराने वेढला आता तो मुक्त करू – ॲड. जाधव
आष्टी मतदार संघ हा भ्रष्टाचाराने वेडला असून प्रत्येक ठिकाणी दोन रुपये कसे मिळतील यासाठी नेते आणि त्यांचे कार्यकर्ते प्रयत्न करतात मग जनतेचं काय ? त्यांचा पैसा पाण्यातच सोडणार का ? जनतेचा पैसा तुटक्या फुलतात जाणार का ? जनतेचा पैसा वाहून जाणाऱ्या पुलाबरोबर जाणार का ? जनतेचा पैसा गुंडगिरीवर खर्च होणार का ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडले आहेत. म्हणूनच अष्टी मतदार संघ भ्रष्टाचाराने वेड ला असून त्याला आता मुक्त करण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत. व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आपण पवार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करू यासाठी या निवडणुकीत उतरायचं आहे, त्यामुळे जनता ही आपल्याला साथ देईल असा विश्वास ॲड. नरसिंह जाधव यांनी व्यक्त केला आहे.
★पाटोदा-शिरूर तालुक्याला फक्त 18 महिन्याचा आमदार!
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघ तयार झाल्यापासून माहितीनुसार फक्त 18 वर्षाचा कार्यकाळ पाटोदा तालुक्याला मिळाला असून त्यानंतर पाटोदा तालुक्याला आमदार मिळाला नसल्यांची खंत पाटोदा शिरूर तालुक्यातील जनता व्यक्त करत असून येणाऱ्या निवडणुकीत की भरून काढण्यासाठी सर्वच कामाला लागल्याचे दिसत आहे. येणाऱ्या काळात पाटोद्याला पाच वर्षाचा आमदार मिळावा हीच अपेक्षा असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पाटोद्याला उमेदवारी मिळावी अशी मागण्याही होऊ लागली आहेत.