★जय हनुमान तालीमचे संस्थापक अध्यक्ष सतीश आबा शिंदेंमुळे युवकांना मिळते नवी दिशा
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी तालुक्याला जय हनुमान तालीमच्या माध्यमातून युवकांना मिळालेली यशाची दिशा ही वाखण्याजोगी असून याच सर्व श्रेय संस्थापक अध्यक्ष सतीश आबा शिंदे यांना जातं कारण की त्यांनी युवकांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून दिला त्यामुळे अनेकांना आपल्या यशाची दिशा ठरवता आली. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये जे हनुमान तालीम चे पाच मल्लांची निवड झाली असून त्यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष सतीश आबा शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये जे हनुमान तालीम चे राहुल काकडे, दत्ता बावणे, प्रदीप झगडे, दादा भवर, अंकुश शिंदे, हे पाच मल्ल पोलीस झाल्याने जय हनुमान तालीम ची यशोगाथा सुसाट असल्याचे दिसून येत आहे. जय हनुमान तालीम च्या माध्यमातून युवकांना नवी दिशा मिळाली असून आपल्या स्वतःची दिशा ठरवण्याची त्यांना चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. जय हनुमान तालीम मधून अनेक अधिकारी पोलीस आर्मी मध्ये मल्ल भरती झाले आहेत. जय हनुमान तालीम मल्ल घडवण्याचं कार्य अधिक जोमाने सुरू आहे, त्याचबरोबर तालीम मधून अधिकारी पोलीस फौजी सुद्धा घडले आहे. नवनिर्वाचित सर्व पोलीस राहुल काकडे, दत्ता बावणे, प्रदीप झगडे, दादा भवर, अंकुश शिंदे, यांचा सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी जय हनुमान तालीम चे संस्थापक अध्यक्ष सतीश आबा शिंदे, वस्ताद सोपान काका शिंदे तसेच मुर्शिदपूर कासारी शिंदेवाडी चे ग्रामपंचायत सदस्य अमोल दरेकर संदीप जगदाळे इत्यादी उपस्थित होते..
★जय हनुमान तालीम फक्त मल्ल नव्हे तर अधिकारी सुद्धा घडवते
जय हनुमान तालीम ही संकल्पना आली तेव्हा एकच ठरवलं होतं की तालमी मधून फक्त मल्लच नव्हे तर अधिकारी सुद्धा घडवण्याचा निर्धार केला होता आणि ते आज होते याचा अभिमान आहेच आणि यापुढे देखील जय हनुमान तालीम मधून मला बरोबर अधिकारी सुद्धा अधिक घडतील यात शंका नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू..
– सतीश आबा शिंदे
संस्थापक अध्यक्ष जय हनुमान तालीम आष्टी.