आठ्ठेगाव पुठ्याची यशाची घोडदौड सुरूच!
★कुसळंबची कन्या ‘ प्रतिक्षा ‘ चे 6 महिन्यात तिसरे पद; कुसळंबाच्या अभिमानात भर!
कुसळंब | प्रतिनिधी
आज भारतात सर्व क्षेत्रात स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे आज ती विमान चालक इंजिनियर प्राध्यापक राष्ट्रपती खासदार मंत्री मुख्यमंत्री राज्यपाल उद्योगपती अशा अनेक पदावर कार्यरत आहेत त्याशिवाय अनेक सामाजिक संस्था चालवत आहेत अगदी त्याच पार्श्वभूमीवर कुसळंब येथील माजी सभापती किसनराव पवार यांची नात प्रतीक्षा बाळासाहेब पवार या मुलीने या वर्षांमध्ये सलग तीन वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले त्यामध्ये प्रमुख्याने सुरुवातीला जानेवारी 2024 मध्ये तलाठी या पदावर ती त्यांची निवड झाली त्यानंतर जून 2024 मध्ये नगरपरिषद कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी या पदी त्यांची निवड झाली.आणि आता परत 16 जुलै 2024 मध्ये MPSC मार्फत STI (राज्य कर निरक्षक) या पदी त्यांची निवड झाली. या वर्षातली ही यशस्वी घोडदौड पाहून समस्त गावकरी कुसळंबकर सह सर्व क्षेत्रातील लोक कौतुक करताना दिसत आहेत…!
★प्रतिक्षा खऱ्या अर्थाने कृतीशिल आदर्श!
संविधानातील कायद्याच्या समानतेच्या मूलतत्त्वावर विकासाची समान संधी मिळाल्यामुळे स्त्रिया आज सक्षम झालेले आहेत .. त्याचे उदाहरण अनेक आहेत परंतु आज कुसळंब येथिल मा. सरपंच /श्री .खं. मा .व उ. मा. विद्या. अध्यक्ष .बाळासाहेब किसनराव पवार यांची जेष्ठ कन्या प्रतिक्षा खऱ्या अर्थाने कृतीशिल आदर्श ठरलेली आहे . त्यांच्या या यशस्वी वाटचालीस खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर लवकरच क्लास 1 आधिकारी होण्याचा निर्धार लवकरच पूर्ण होवो.
– अतुल शेलार
सामाजिक कार्यकर्ता कुसळंब
★लवकरच क्लास वन अधिकारी
प्रतिक्षा ची या वर्षातील तिसऱ्यांदा शासकीय पदी निवड झाल्याबद्दल आम्हा सगळ्यांना खूप अभिमान वाटतो प्रतीक्षाने केलेल्या कष्टाचा फळ तिला मिळाला आहे. तिचं क्लासवन होण्याचं स्वप्न सुद्धा लवकरच पूर्ण होईल हे तुझ्या कष्टावरून जिद्दीवरून दिसून येत आहे. पण जेव्हा प्रतीक्षा क्लास वन अधिकारी होईल आणि तिच्या हातून समाजाची गोरगरिबांची सेवा होईल त्यावेळेस सर्वात जास्त आनंद आणि समाधान मला असेल आणि हे सर्व तुझ्या हातून घडावं यासाठी खंडेश्वर चरणी प्रार्थना करतो…
– बाळासाहेब पवार
माजी सरपंच कुसळंब.
★ प्रयत्नातून यश मिळतच!
मागच्या वेळी थोड्या मार्क्स ने STI या पदापासून दूर राहिले होते.खचून न जाता मी परत प्रयत्न केले आणि आज ते पद मिळाले त्यामुळे खरच खूप आनंद झाला आहे.या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या परिवाराचा खूप मोलाचा वाटा आहे.
– प्रतिक्षा पवार