पोलीस असलाचे सांगत तीन लाख लंपास!
परळी | प्रतिनिधी
पोलीस असल्याचे सांगत हातोहात तीन लाख रुपये लंपास केल्याची घटना परळी तालुक्यातील चांदापूर रोडवर घडली.या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगाखेड तालुक्यातील डोंगरजवळा येथील रहिवासी असलेल्या सुरेश केरबा मुंडे यांनी जमीन व्यवहारासाठी ठेवलेले तीन लाख रुपये परळी तालुक्यातील चांदापुर येथील इवाई माधव गित्ते यांना उसने देण्यासाठी जात असताना चांदापूर रोडवर असलेल्या मंगल कार्यालयाजवळ दोन अनोळखी इसमाने पाठलाग करून आम्ही पोलीस आहोत असे सांगत झाडाझडती घेत पत्नीच्या पर्स मध्ये असलेले तीन लाख रुपये घेऊन फरार झाले.या प्रकरणी सुरेश मुंडे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.