सातत्यपूर्ण मेहनत केल्यास यश हमखास मिळते – दीपकदादा घुमरे
पाटोदा | प्रतिनिधी
युसुफवडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय युसुफ वडगाव या ठिकाणी मंगळवार दिनांक 4 रोजी इयत्ता दहावी व बारावी तसेच वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था सचिव श्री दीपक दादा घुमरे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी काळे साहेब पोलीस निरीक्षक युसुफ वडगाव, बोराडे सर केंद्रप्रमुख, श्री काळु माळी सर कें.मु.अ. युसुफ वडगाव,डॉ, श्रीकृष्ण थळकरी पशुवैद्यकीय अधिकारी हे होते. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांना पुढील भावी शैक्षणिक आयुष्यात आणखीन कष्ट करण्याची उर्मी व ऊर्जा मिळण्यासाठी इयत्ता दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी तसेच विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थी आणि राज्यस्तरीय स्काऊट गाईड पुरस्कार प्राप्त विद्यार्थी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनास निवड झालेली विद्यार्थी आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षेतील नावलौकिक मिळवलेले विद्यार्थी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच त्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन करण्यात आले.शिक्षण महर्षी कै.द.बा.घुमरे तात्या यांच्या स्वप्नातून साकारलेली व त्याच विचारांचा वसा आणि वारसा घेऊन चालणाऱ्या आदरणीय दीपकदादा घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या शाळेने ग्रामीण भागातील अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था असा नावलौकिक आजही कायम राखल्याचे या सत्कार सोहळ्यातून दिसून आले. याचबरोबर शाळेसाठी वर्षभर विविध शैक्षणिक कार्यक्रम तसेच राबवण्याचा आराखडा विद्यार्थ्यांना यशस्वीतेसाठी सातत्यपूर्ण व सचोटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे याबाबत दीपकदादा घुमरे यांनी मार्गदर्शन केले.आणि विद्यार्थ्यांनी देखील भावी आयुष्यात कशा पद्धतीने कष्ट करावेत व मेहनतीला पर्याय नाही हेच पुन्हा एकदा त्यांनी प्रतिपादन केले.याप्रसंगी लक्ष्मीकांतराव जोशी, अरुण रावजी चोपणे,कोरसळे सर, शेजुळ सर,लिंबराज पाटील, प्रभाकर जोशी, योगेश समुद्रे साहेब प्रा.भुसारी सर व पंचक्रोशीतील बहुसंख्य पालक व व शाळेचे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री.भोसले सर यांनी केले. शाळेच्या गुणवत्तेबद्दल व गुणवंत विद्यार्थ्यांबद्दल तसेच शाळेच्या होत असलेल्या वाटचालीबद्दल आणि शाळेमार्फत चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दलची माहिती आणि मागील वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शाळेच्या गुणवत्तेचा आढावा प्रस्तविकामधून प्राचार्य भोसले सरांनी मांडला सूत्रसंचालन श्री गडकर व श्री तरकसबंद सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री चौधरी सरांनी केले