12.9 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

खडतर प्रवासातून पवार यांनी समाजात पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला – उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

मास कम्युनिकेशन व जर्नालिझम परिक्षेत धनराज पवार उत्तीर्ण; शिक्षक बँक, शाखा जामखेड यांच्या वतीने सन्मानित

खडतर प्रवासातून धनराज पवार यांनी आपले शिक्षण केले असून मास कम्युनिकेशन व जर्नालिझम या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.पत्रकारिता कशी असावी हे धनराज पवार यांच्या कार्यातून दिसून येते. नम्र स्वभाव व प्रामाणिकपणा हा त्यांचा नेतृत्व गुण आहे. सर्वसामान्य पासून ते समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना ते आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसिद्धी देतात.वंचित,पिडितांचे प्रश्न तसेच विविध प्रश्नांवर वाचा फोडण्याचे काम ते करतात. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतला एवढंच नाही तर त्यांना सर्वसामान्य परिस्थितीची जाणीव आहे. खडतर प्रवासातून पवार यांनी समाजात पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला.अनेक अडचणीतून त्यांनी मात करत आज समाजामध्ये एक प्रामाणिकपणा व साधेपणा त्यांच्या कार्यात दिसून येत आहे. असे गौरवोद्गार उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे काढले.गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांची अहमदनगर जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शाखा जामखेड यांच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यानिमित्त युवा पत्रकार धनराज पवार यांनी नुकतीच मास कम्युनिकेशन व जर्नलिझम परीक्षेत यश संपादन केले आहे. याबद्दल पत्रकार धनराज पवार यांचा सत्कार उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे,संचालक संतोषकुमार राऊत व विश्वस्त मुकूंदराज सातपुते यांच्या हस्ते व उपस्थित शिक्षकांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक संतोष कुमार राऊत, विश्वस्त मुकुंदराज सातपुते ,एकनाथ चव्हाण प्रताप पवार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी संचालक संतोष कुमार राऊत ,विश्वस्त मुकुंदराज सातपुते, एकनाथ चव्हाण ,केशवराज कोल्हे अनिल आष्टेकर, अर्जुन पवार,प्रताप पवार, किशोर राठोड, विनोद सोनवणे, किरण माने, मनोज कुमार कांबळे ,भगवान समुद्र, तात्या घुमरे, रामहरी बांगर, मारुती गीते, भाऊसाहेब डिडूळ, संभाजी तुपेरे ,सचिन पवार, नितेश महानवर , राजीव मडके,शिवाजी हजारे, बाळासाहेब जरांडे ,पांडुरंग मोहोळकर, गणेश नेटके, संतोष लगड, शकील बागवान, अविनाश नवसरे ,बाळासाहेब गांगर्डे, माजिद शेख, सुभाष नेटके, मुकुंद ढवळे ,संतोष मुरूमकर, दिगंबर माने, संतोष कुऱ्हे, संतोष उगले ,गंगाराम घायतडक आदी शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश नेटके व आभार प्रदर्शन संभाजी तुपेरे यांनी मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!