- अंमळनेर सर्कल मधील सर्व ठिकाणी वृक्षरोपण, शालेय साहित्य वाटपासह विविध कार्यक्रम
पाटोदा / प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व सुरेश आण्णा धस समर्थक भाऊसाहेब अण्णा भवर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अमळनेर सर्कलमधील विविध गावांमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये वृक्षरोपण शालेय साहित्य वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दवाखान्यामध्ये रुग्णांना फळे वाटप विविध उपक्रमातून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुरेश धस समर्थक भाऊसाहेब अण्णा भवर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजन करण्यात आले आहे. तर मुगगाव येथे सहा जुलै रोजी संध्याकाळी अभिष्टचिंतन सोहळ्याचा मोठा कार्यक्रम आणि अन्नदानाचे आयोजन केले आहे.
भाजपा ज्येष्ठ नेते सुरेश धस समर्थक भाऊसाहेब अण्णा भवर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अंमळनेर सर्कल मधील विविध ठिकाणी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुगाव येथे सहा जुलै रोजी संध्याकाळी अभिष्टचिंतन सोहळ्याचं मोठ्या थाटामध्ये आयोजन असून संध्याकाळी सर्वांना अन्नदानाचा आयोजन केले आहे, याची माहिती भारतीय जनता पार्टी अंमळनेर सर्कल व सुरेश धस मित्र मंडळ अंमळनेर सर्कल यांच्या वतीने देण्यात आली आहे.
धस समर्थक भाऊसाहेब भवर यांचं आजपर्यंत कार्य!
आष्टी मतदार संघाचे भाग्यविधाते आमदार सुरेश आण्णा धस यांची कट्टर समर्थक ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अण्णा भवर यांचे आज पर्यंतचे कार्य खूप मोठे राहिले आहे. यामध्ये गोरगरीब भिंतींच्या मुला मुलींच्या लग्नाचं एक प्रकारे कन्यादानच जेवण आणि भांड्याची व्यवस्था करून केली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून शिक्षणाकडे वळण्याचा संदेश दिला आहे तसेच देव देवस्थाना मंदिरासाठी देणगी तर अन्नदान म्हणून मोठी मदत देखील करत आहेत. विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्रोत्साहन करण्यासाठी सुद्धा काम करत असून कोरोना काळात त्यांचे कार्य अफाट राहिले आहे तर अमळनेर सर्कलमधील दवाखान्यातील सामान्यांच्या मदतीला नेहमीच धावून जाताना दिसत आहेत तर नवरात्र उत्सवामध्ये देवीचे दर्शन जनतेला मोफत करण्याचा सुद्धा काम त्यांनी केले आहे यात शिलेदाराच्या वाढदिवसानिमित्त अंमळनेर सर्कल मधील जनतेकडून भरभरून शुभेच्छा द्यायला सुरुवात झाली आहे…