14.7 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

जनतेच्या प्रत्येक समस्येवरील पर्याय जनतेच्याच हाती ” विधानसभा महाराष्ट्राची! “

विचार जनतेचा! मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर,असदुद्दीन ओवेसी, राजू शेट्टी सत्तेच्या केंद्रस्थानी असावेत!

★संघर्ष योद्धांची महाराष्ट्राच्या विधानसभेत इंट्री होणार का ?

बीड | सचिन पवार

महाराष्ट्राची भूमी ही विचाराची भूमी आहे. इथे संतांचे विचार जोपासले जातात. महापुरुषांच्या विचाराचा अनुकरण केलं जातं तर क्रांतिकारकांना सलाम करत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न इथे लढवय्ये नेते, कार्यकर्ते करतात. महाराष्ट्रामध्ये विचाराची चळवळ आणि लढण्याची धमक असणारे नागरिक आहेत. महाराष्ट्राची एक वेगळीच खासियत आहे ती म्हणजे फाटका माणूसच क्रांती घडू शकतो आणि क्रांतीची मशाल पेटूही शकतो. समाजासाठी झटणारे शेतकऱ्यांसाठी लढणारे माणुसकी जपण्यासाठी आवाज उठवणारे नेते सुद्धा महाराष्ट्रातच पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटलाचा उदय झाला. संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पेटलेली मशाल असदुद्दीन ओवेसी यांच्या साथीने पुढे ठेवण्याचे काम त्यांनी सुरू केलं. राजू शेट्टी, बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत महाराष्ट्रातील चळवळीची लढवय्या नेत्यांची चुणूकच पाहायला मिळाली. अशा विविध नेत्यांनी आपापलं स्थान आपापल्या विचाराशी ठाम ठेवून समाजाला एकजूट करण्याचं काम केलं आहे. पण आता हीच एकजूट जनतेच्या मनामध्ये रुजली आहे. याच लढवय्या नेत्यांसाठी जनतेने विचार केला आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू, असदुद्दीन ओवेसी, राजू शेट्टी यांच्यासारख्या चळवळीतील लढवय्या नेत्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या समस्यावरील पर्याय निवडण्यासाठी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एकत्रित लढून महाराष्ट्राला नवीन पर्याय द्यावा अशा भावना जनतेतून समोर येताना दिसत आहे. यात संघर्ष योद्धांची महाराष्ट्राच्या विधानसभेत एन्ट्री होईल का ? याच संघर्ष योद्धांमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगले दिवस येणार का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसऱ्या बाजूने विचार केला आणि हे सर्वच नेते एकत्रित येऊन महाराष्ट्राची विधानसभा एकत्रित लढून सत्तेत येऊन सर्वसामान्य जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी जर पुढाकार घेतला तर सत्तेत येऊन सर्वसामान्य जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी जर पुढाकार घेणार असतील तर सर्वसामान्य जनता सुद्धा यांना डोक्यावर घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवतील आणि सत्तेच्या चाव्या याच लढवावी आणि त्यांच्या हाती देतील यातील मात्र शंका नाही परंतु या सर्वांनी एकत्रित येऊन महाराष्ट्राची विधानसभा लढवावी आणि तिथून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत अशाच भावना व्यक्त होताना दिसत आहेत…

★लढवय्ये फाटकेच पण जनतेच्या हिताचे काम करणारे

मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासारखे अनेक चळवळीतील नेते अगदी सर्वसाधारण घरातील फाटकेच नेते आहेत परंतु त्यांच्या एका आवाजावर लाखोंचा जनसमुदाय जमतो यावरूनच त्यांची उंची किती आहे हे आपल्या लक्षात येईल त्यामुळे हेच फटके नेते एकत्रित आले तर महाराष्ट्राची सत्ता बदलेले यातील मात्र शंका नाही.

★सर्व लढवय्ये एकत्रित आले तर जनता सोबत असेल

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता संघर्ष योद्धांनी येऊन महाराष्ट्राचं राजकारण चांगलं करावं जातीपाती पलीकडे जाऊन सर्व जाती धर्मातील लोकांना एकोपायणी नांदण्यासाठी प्रयत्न करावेत आणि हेच काम महाराष्ट्रातील संघर्ष योग्य करू शकतात लढवय्ये नेते करू शकतात त्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्राची विधानसभा लढवावी त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील जनता खंबीरपणे उभी राहील असं सुद्धा बोलले जात आहे.

★संघर्ष योद्धांची चळवळ एकत्र आली तर…

महाराष्ट्रामध्ये संघर्ष योद्धांची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ती जर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर एकत्र आली तर सर्वच पक्षांना मोठा हादरा बसू शकतो यातील मात्र शंका नाही. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा आंदोलन अधिक तीव्र होत असताना त्यांची प्रकृती खालावत चालली आहे परंतु महाराष्ट्राच्या कोणत्याच नेत्यांचा आणि पक्षाचे विशेष लक्ष नसल्याने जरांगे पाटलांनी आता महाराष्ट्रातील सर्वच संघर्ष योद्धांशी चर्चा करून युती करून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या रिंगणात उतरावं आणि महाराष्ट्र ताब्यात घ्यावा अशीच भावना जनतेमधून पुढे येत आहे…

★संतांच्या विचाराचं राज्य म्हणजे महाराष्ट्र!

मराठी राजांचा वारसा आणि पुरोगामी महापुरुष तसेच संतांच्या विचाराचं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे.गोरगरीब, कष्टकरी ,शेतकरी ,शेतमजूर ,दीन – दुबळ्या ,अपंगाच आणि रयतेचं राज्य सत्तेत येण्यासाठी या सर्व नेत्यांनी एकत्र आले पाहिजे… कारण या राजकीय नेत्यांप्रती एक तुकाराम महाराजांचा काव्य शोभत आहे.
नसावे ओशाळ ।
मग मानती सकळ ॥
जाय तेथे पावे मान ।
चाले बोलिले वचन ॥
व्यक्ती जेवढी स्वाभिमानी असते, त्याला समाजामध्ये तेवढीच किंमत असते. माणूस जेव्हा कोणाच्या उपकारात दबलेला नसतो तेव्हाच सगळे लोक त्याला मानत असतात. म्हणून वरची मंडळी सर्व एकत्र आली तर महाराष्ट्रामध्ये त्यांना चांगला मान मिळेल. आणि मान तेव्हाच मिळतो माणूस कुणाचा ‘मिंधा’ नसतो..! आता असं घडल तर विविधतेने नटलेल्या लोकशाहीला सुद्धा अभिप्रीत गोष्ट असेल.
– अतुल शेलार
( सामाजिक कार्यकर्ते कुसळंब.)

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!