सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पाटोदा | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे मा उपाध्यक्ष तथा सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांचा वाढदिवस पाटोदा येथील बांगर निवासस्थानी प्रचंड कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व उत्साहात साजरा झाला.
दरवर्षीप्रमाणे सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते यावेळी संत मीराबाई संस्थान महासांगवी च्या मठाधिपती ह भ प राधाताई महाराज यांनी शुभेच्छा देऊन उपस्थिततीताना रामकृष्ण बांगर यांच्या कार्यकर्तृत्वावर मार्गदर्शन केले. प्रारंभी सकाळीच सौ सत्यभामाताई बांगर व कुटुंबीयांनी श्री राम कृष्ण बांगर यांचे वाढदिवसानिमित्त औक्षण केले. नंतर कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला तसेच नवनिर्माण व प्रगती शिक्षण संस्थेच्या वतीने रामकृष्ण बांगर व सत्यभामाताई बांगर यांचा यथोचित सत्कार करून सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे वाढदिवसानिमित्त राज्यभरातून अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडिया च्या माध्यमातून व प्रत्यक्ष मोबाईल द्वारे आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला. या झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील विविध गावचे सरपंच सेवा संस्थेचे चेअरमन संचालक ग्राप सदस्य अनेक सहकारी संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ह भ प रामकृष्ण रंधवे बापू यांनी रामकृष्ण बांगर यांना भेटून शुभेच्छा दिल्या.