16.9 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्री खंडेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम ; 12 वी शाखेचा निकाल 80 टक्के तर 10 वी चा निकाल 100 टक्के

★राऊत मयुरी 12 वी 86.33 गुण घेऊन सर्वप्रथम तर 10 वी पवार सानिका 94.80 गुण घेऊन सर्वप्रथम

कुसळंब | अतुल शेलार

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील श्री खंडेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची गेल्या अनेक वर्षाची उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम राखली गेली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी व 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावरून जाहीर झाला आहे. श्री खंडेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 80.85 टक्के तर 10 वी चा निकाल 100 टक्के लागला असून कुमारी मयुरी महारुद्र राऊत हिने 86.33% मिळून कला शाखेत उच्च माध्यमिक विद्यालयातून सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे तर शुभांगी आबासाहेब बळे 78% घेऊन द्वितीय क्रमांक, पूजा दादा सुळे हिने 77.67% मिळून तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर इयत्ता 10 वी मध्ये कुमारी पवार सानिका अण्णा हिने 94.80% गुण घेत सर्वप्रथम क्रमांक पटकावला तर पवार प्रणव गौतम याने 93.60% मिळून द्वितीय क्रमांक मिळवला तसेच जाधव उमेश सुधाकर, चव्हाण सत्यम गुलाब, गवळी अस्मिता शिवाजी यांनी 93.40% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवले आहेत. या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विभागातील प्राचार्य एस.के. पवार सर, प्रा.गंडाळ जी.एन., प्रा.पवार जी.बी., प्रा.काळे एच.एन., प्रा.चव्हाण जी. ए. यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या यशाबद्दल प्रगत विद्या प्रसार मंडळ कुसळंबचे संस्थापक सचिव श्री.किशन पवार बापू, अध्यक्ष बाळासाहेब पवार बाप्पा, प्राचार्य एस के पवार सर, पर्यवेक्षक श्री शेलार व्ही.बी.सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षक उत्तर कर्मचारी तसेच कुसळंबचे आजी-माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य परिसरातील शिक्षण क्षेत्रातील सजान नागरिकांनी तसेच पत्रकार बांधव यांच्याकडून अतुलनीय यश संपादन केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

★सर्वांच्या प्रयत्नाने यश संपादन

गेल्या एक-दोन वर्षांमध्ये सातत्याने शाळेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी गावोगावी जाऊन अभ्यासिका उपक्रम राबवून व त्यावर प्रत्येक आठवड्याला चाचणी परीक्षा घेऊन. मुलांच्या अभ्यासामध्ये अमुलाग्र बदल घडून आलेला यावेळी निकालाच्या माध्यमातून स्पष्ट दिसत आहे .त्याच बरोबर प्राचार्य एस के सरांच्या माध्यमातून सर्व शिक्षक व स्टाफ यांनी केलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे आजचा निकालाच्या माध्यमातून सफलता प्राप्त झाली असं मी या ठिकाणी समजतो.
– बाळासाहेब किसनराव पवार
अध्यक्ष – श्री खंडेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुसळंब.

★शिक्षक विद्यार्थ्यांचा समन्वय महत्त्वाचा

शाळा हे विद्यार्थ्यांचे दुसरे घर असतं तिथे असणारे शिक्षक आणि विद्यार्थी यांच समन्वय असणं खूप महत्त्वाच आहे आणि तेच श्री खंडेश्वर विद्यालय येथे असल्याने विद्यार्थ्यांमध्ये हा घडलेला अतुलनीय बदल आहे, त्यामुळे याच सर्व श्रेय शिक्षक-विद्यार्थी-पालक-संस्थाचालक यांचे आहे.
शंकर किसनराव पवार
प्राचार्य श्री खंडेश्वर विद्यालय कुसळंब.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!