16.9 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

वादळी वाऱ्याचा फटका!

★सुदैवाने घागरवाडा येथील शेतकरी कुटुंब बचावले

धारूर | प्रतिनिधी

मागील चार ते पाच दिवसापासून सायंकाळच्या वेळी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी सुरू आहे . पावसातील वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडणे तसेच घरावरील पत्रे उडण्याचे प्रकार घडत आहेत .या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
धारूर तालुक्यातील घागरवाडा येथे अवकाळी पाऊस व विज पडल्यामुळे शेतकऱ्याच्या घरातील साहित्य जळून खाक झाले आज दुपारी वादळी पावसामुळे घागरवाडा येथील शेतकरी अशोक महादेव नागरगोजे यांच्या घरात आग लागून घरातील साहित्याचे नुकसान झाले.आगीचेकारण समजू शकले नाही .दुसरे शेतकरी शेषराव बाजीराव नागरगोजे यांच्या घरावर बाभळीचे मोठे झाड कडून घराचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
तालुक्यात मागील पंधरा दिवसापासून अधून मधून अवकाळी पावसाची हजेरी सुरूच आहे . .या पावसाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात सुसाट वारा होत असल्यामुळे याचा फटका शेतीत मशागतीची कामे करणाऱ्या मजुरांना होत आहे .तसेच घरावरील पत्रे उडणे , झाडे मोडून पडणे हे प्रकार सतत होत आहेत .रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान सोनीमोहा , घागरवाडा, थेटेगव्हान , आंबेवडगाव , जहागिरमोहा परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यावरील पत्रे उडणे , झाडे मोडून पडण्याचे प्रकार घडत आहेत .अवघ्या दहा ते पंधरा मिनिटे होत असलेले सुसाट वाऱ्यामुळे सर्वत्र हाहाकार उडत आहे .तसेच या वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकारे घडत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!