★पैठण ते पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था ; जन आंदोलन करू – डॉ.गणेश ढवळे
पाटोदा | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातुन जाणारा जाणारा पैठण ते पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ एकुण ६७ किलोमीटर लांबीचा असुन आष्टी पाटोदा मतदान संघातुन जात असुन परळी येथील केशव आघाव यांच्या तिरूपती कन्स्ट्रक्शन मार्फत रस्त्याचे काम ४-५ वर्षांपासून सुरू असुन अजुनही पुर्णत्वास गेलेले नाही मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पाटोदा शहर ते घुमरा पारगाव दरम्यान रंदवेवस्ती याठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या असुन दुचाकी वाहनांचे टायर भेगात अडकून वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.या सुमार दर्जाच्या कामास जबाबदार कंत्राटदार तिरुपती कन्स्ट्रक्शन व या कामावर देखरेख करणारे अभियंते यांच्यावर दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, पाटोदा तालुका कार्याध्यक्ष पत्रकार शेख जावेद, तालुकाध्यक्ष हमीद खान पठाण यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत माजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व अरविंद काळे, प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
★पंकजाताईच्या ट्वीटमुळे नितिनजी गडकरी यांनी नविन रस्ता करण्याचे आदेश दिले होते – डॉ.गणेश ढवळे
पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट कामामुळे पाटोदा तालुक्यातील अनपटवाडी येथील भेगा पडलेल्या रस्ताकामाची डॉ . गणेश ढवळे यांनी फोटो सहीत पोलखोल प्रसार माध्यमांमध्ये केल्यानंतर तेच फोटो माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंढे यांनी १८ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ” ट्वीट” केल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत कंत्राटदारावर कारवाईचे आदेश देत रस्ता फोडून नवीन करावा लागला होता.
★अर्धवट काम, कंत्राटदाराने पळ काढला, रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी जन आंदोलन करू – राहुल जाधव, मुकुंद शिंदे
पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ आष्टी पाटोदा मतदार संघातून जात असुन एकुण ६७ किलोमीटरचे काम असुन परळी येथील तिरूपती कन्स्ट्रक्शन कडे काम असुन पाटोदा शहरातील राजमहंमद चौक येथील मांजरा नदीवरील पूल, चुंभळीफाटा, मळेकरवाडी येथील घाट, पारगाव, अनपटवाडी तसेच भीमनगर , येथील रस्ता आदि ठिकाणी वारंवार पाटोदकरांनी निवेदने तसेच रास्ता रोको आदि आंदोलनानंतर सूद्धा कोणतीही सुधारणा झाली नसुन कंत्राटदाराने रस्ता कामासाठीची संपूर्ण यंत्रसामग्री घेऊनच पळ काढला आहे त्यामुळे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी सामाजिक संघटना व सर्वपक्षीय जन आंदोलनाचा ईशारा राहुल जाधव (राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष) आणि मुकुंद शिंदे (शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष यांनी दिला आहे.