कलेक्टर मुंडेताई तुम्ही जनतेच्या का भाजपाच्या सेवक ?
★इंजेगाव गावचा व्हिडिओ दिसत नाही का कलेक्टर मुंडेताईंना
बीड | प्रतिनिधी
परळी तालुक्यात इंजेगाव सारखे अनेक गावातून बोगस मते होताना व्हिडिओ जगाने पाहिले, ज्यांनी पोलीस अध्यक्ष यांच्याकडे थेट तक्रारी केल्या सुषमा अंधारे यांच्या कुटुंबीयांना मतदान करून दिले नाही अशी जाहीर पोस्ट त्यांनी केली यावर कुठलीही चौकशी न करता निवडणूक आयोग जर अहवाल देऊन बोगस मते झाले नाही म्हणत असेल तर आयोगाला मोतीबिंदू झाला आहे का ? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या दिवशी जे तांडव झाले आहे त्यामध्ये सर्व व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि समाज माध्यमातून समोर आलेले आहेत तरीही निवडणूक आयोग म्हणतोय मतदान बोगस झाले नाही अशा स्टेटमेंटने लोकांच्या मनात हुकूमशाही आली की काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकशाही परळीत आहे की नाही असा प्रश्न पडावा एवढा गैरप्रकार केल्याचे लोक बोलत आहेत आणि तसे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. आणि एक गावात मुस्लिम मतदारांना केवळ बोटाला शाई लावण्यात आलेली असल्याचे अनेक लोक बोलत आहे. एकूणच बीड जिल्ह्यातील लोकसभेचे वातावरण पाहिलं तर लोकशाही नव्हे हुकूमशाही असल्यासारखं निर्माण झाला आहे तर प्रशासनाचा हलगदरीपणा हा भाजपचे सेवक झाल्याचे दर्शवत आहे तर तक्रारी करूनही निवडणूक आयोग काहीच करत नसल्याने त्यांनाही मोतीबिंदू झाल्याचं दिसून येत असल्याच्या चर्चा देखील जनतेमधून पुढे येत आहेत.
★कलेक्टर ताई तुम्ही भाजपच्या नाही जनतेच्या सेवक
निवडणूक आयोगाने या बीड जिल्ह्यात नाते असलेल्या कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे यांना बदली देणे नियमात होते मात्र त्यांना बीडमध्ये कर्तव्य देऊन निवडणूक करण्यास बाधक निर्णय घेतला. बजरंग सोनवणे यांनी जाहीर आरोप करत कलेक्टर मुंडे पक्षपात करत असल्याचे आरोप केले आहेत कलेक्टर मुंडे यांनी उमेदवार मुंडे यांना मदत होईल अशी भूमिका घेतल्याचे बजरंग सोनवणे यांनी जाहीर म्हटले जे जनतेला देखील पटत असल्याचे चित्र आहे.