16.9 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

पूल केला का स्पीड ब्रेकर ?

★कुसळंब ते वांजरा फाटा रस्त्यावरील पुलाचा आणि रस्त्याचा ताळमेळ जुळेना

कुसळंब | प्रतिनिधी

कुसळंब वांजरा फाटा रस्ता अतिशय महत्त्वाचा असून महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने गहिनीनाथ गड, भगवान भक्तीगड, हनुमान गड, श्री क्षेत्र खंडेश्वर देवस्थान या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. कुसळंब ही अठ्ठेगाव पुठ्ठ्यासह परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. कुसळंब वांजरा फाटा रस्त्याची काम पाहिजे तेवढे क्वालिटीचे आणि दर्जेदार न झाल्याने रस्त्याची दुरावस्था झालेली पाहायला मिळते सोशल मीडिया वर्तमानपत्राच्या माध्यमातून या रस्त्याच्या व पुलाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तरी देखील प्रशासनाकडून गुत्तेदारांकडून कसलीच खबरदारी न घेतल्याने रस्त्याची आणि पुलांची दुरावस्था होताना दिसत आहे. कुसळंब वांजरा फाटा रस्ता हा वेगळाच रस्ता म्हणून ओळखला जातो तर सध्या पुलाचे बांधकाम चालू आहे परंतु पुलाचा आणि रस्त्याचा काहीच ताळमेळ दिसत नाही हा पूल आहे का स्पीड ब्रेकर हेच कळायला तयार नाही रस्त्यात आणि पुलाच्या मध्ये व्यवस्थित जोडणे दिल्याने त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर झाल्यासारखं दिसत आहे त्यामुळे अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित गुत्तेदाराने इंजिनिअर यांनी याची सुधारणा करावी नसता होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे आणि कुसळंब ग्रामस्थांच्या वतीने लवकरच मोठे आंदोलन उभे केले जाणार असल्याची माहिती देखील देण्यात येत आहे.

★पूल आणि रस्त्याचा मेळ जुळवा नाहीतर तुमचाच खेळ होईल

वांजरा फाटा कुसळंब रस्त्याची अवस्था म्हणजे ठिगळ जोडणे अशी आहे तर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची अवस्था ही स्पीड ब्रेकर सारखी झाली आहे. रस्त्याचा आणि पुलाचा कसलाच मेळ व्हायला तयार नाही. संबंधित अधिकारी इंजिनिअर यांनी पूल आणि रस्त्याचा मिळवावा नसता तुमचा खेळ होईल असा इशारा कुसळंब ग्रामस्थांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!