★अकरा एकर मध्ये मुगामध्ये होणार जरांगे पाटलांची सभा
कुसळंब | प्रतिनिधी
8 जून रोजी नारायणगड येथे होणाऱ्या सहा कोटी मराठ्यांच्या अभूतपूर्वक सभेसाठी संवाद बैठक आयोजित केल्या जात असून गुरुवार दिनांक 9 मे रोजी दुपारी तीन वाजता मुगाव येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गरजवंत मराठ्यांची संवाद साधण्यासाठी येणार आहेत तरी सकल मराठा समाज मुगाव च्या वतीने या संवाद बैठकीचा आयोजन केले असून अंतापुर, वाहली, निवडुंगा, लांबरवाडी, सुपा, कुसळंब, सौताडा, सावरगाव, वाहली, चिखली, चिंचोली, बेदरवाडी, गंडाळवाडी इत्यादी गावातील नागरिकांकडून आयोजन करण्यात येत आहे.
मुगगाव येथे 9 मे रोजी दुपारी तीन वाजता संघर्ष योद्धा म्हणून जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये नारायण गड येथे होणाऱ्या आठ जून रोजी च्या सभेसाठी संवाद बैठक आयोजित केली आहे. या संवाद बैठकीसाठी अंतापुर, वाहली, निवडुंगा, लांबरवाडी, सुपा, कुसळंब, सौताडा, सावरगाव, वाहली, चिखली, चिंचोली, बेदरवाडी, गंडाळवाडी इत्यादी गावातून नागरिक मोठ्या संख्येने येणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान देखील सकल मराठा समाज मुगगावच्या वतीने करण्यात येत आहे.
★मुगगाव मध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी
मुगाव येथे नऊ मे रोजी होणाऱ्या संवाद बैठकीची जोरदार तयारी सुरू असून दहा ते पंधरा गावातील नागरिक या सभेसाठी उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे जवळपास दहा एकर मध्ये या सभेचे आयोजन केले असून सर्व व्यवस्था केली आहे असे देखील सांगण्यात आले आहे.