★जरांगे पाटील सर्व कार्यक्रम रद्द करून अंत्यविधीसाठी उपस्थित
बीड | प्रतिनिधी
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी तथा राजमुद्रा संघटनेचे संस्थापक मराठा सेवक किशोर आप्पा पिंगळे यांचे वडील काही बाजीराव गिरमाजी पिंगळे यांचे सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यू समय ते 81 वर्षाचे होते. सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मोंढा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच बीड जिल्हा भरातून हजारोंच्या संख्येने किशोर पिंगळे यांच्यावर प्रेम करणारे मित्रपरिवार अंत्यविधीसाठी जमला होता. पिंगळे कुटुंबीयांच्या दुःखामध्ये दिव्य वास्तव परिवार सहभागी आहे.
★किशोर पिंगळे यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी जरांगे पाटलांचे सर्व दौरे रद्द!
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे अगदी जवळचे सहकारी किशोर पिंगळे यांच्या वडीलाच अल्पशा आजाराने सहा मे रोजी सकाळी दु:खद निधन झाल्याची बातमी कळताक्षणी जरांगे पाटलांनी दिवसभराचे सर्व आयोजित कार्यक्रम रद्द करून अंत्यविधीला उपस्थित राहणं अत्यंत महत्त्वाचं समजलं आणि थेट बीड गाठले.