★6 मे रोजी आष्टीत ईदगाह मैदान मध्ये होणार जाहीर सभा
पाटोदा | प्रतिनिधी
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची सहा मे रोजी ईदगाह मैदान आष्टी येथे होत असून पाटोदा तालुक्यातील पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पाटोदा तालुका अध्यक्ष शिवभूषण जाधव यांनी केले आहे.
बीड लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ सहा मे रोजी ईदगा मैदान आष्टी येथे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब हे येणार आहे. पाटोदा तालुक्यातील सर्व मतदार बांधवांनी कार्यकर्त्यांनी साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बजरंग बप्पा सोनवणे यांच्या विजयाच्या सभेचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा आणि पवार साहेबांचे हात बळकट करा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पाटोदा तालुका अध्यक्ष शिवभूषण जाधव यांनी केले आहे.
★पाटोद्यातून हजारो बांधव येणार सभेला
देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब हे बीड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ सहा मे रोजी आष्टी येथे येत असून या सभेसाठी पाटोदा तालुक्यातील हजारो मतदार बांधव येणार असल्याची माहिती शिवभूषण जाधव यांनी सांगितले.