- ” पंकजाताई ” 50 टक्के च्या आतील ओबीसी प्रवर्गात मराठ्याचा समावेश करण्याची मागणी करा : मराठा समाज
मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची पंकजाताई मागणी करा ; मराठा समाज डोक्यावर घेईल!
सोशल मीडियावर पंकजाताई च्या फेटा न बांधण्याच्या प्रतिक्रियेवर मराठा समाजाची प्रतिक्रिया!
मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने वंजारी समाजाला आरक्षण दिलं त्याच पद्धतीने पंकजाताई तुम्ही मराठ्यांना आरक्षण मिळवून द्या!
पंकजाताई तुम्ही फक्त मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी करा मराठा समाज तुम्हाला मानाचा फेटा बांधील!
पाटोदा / सचिन पवार
महाराष्ट्रातील मराठा समाजाची आरक्षणाबाबतची भूमिका ही ओबीसी प्रवर्गातून 50% च्या आतील हक्काचे आरक्षण मिळावे हीच आहे. परंतु महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल होताना दिसत आहे. कुणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पत्रकार परिषदेत घेत आहे तर कुणी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी हे करणार नाही ते करणार नाही असं बोलून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देश पातळीवरच्या नेत्यांपासून ते गाव पातळीच्या येत्यापर्यंत सर्वच नेतेमंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करत असल्याचा कांगावा करताय. परंतु मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण मिळेल आणि टिकेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करतच नाहीत फक्त आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे असंच बोलत आहेत. आत्ताच पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही असं वक्तव्य करून मराठा समाजाला मी तुमच्याबरोबर आहे असा संदेश दिला. तू चांगला आहे परंतु मराठा समाजाला आरक्षण फक्त ओबीसी प्रवर्गातील 50% च्या आतील आरक्षण घेण्याची भूमिका तुम्ही घ्या अशीच मराठा समाजाने पंकजाताईला सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी केली आहे. तुम्ही जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या म्हणाला तर मराठा समाज तुम्हाला मानाचा फेटा बांधून तुमच्याबरोबर कायम एकजुटीने राहण्याचा संदेश देईल अशा पोस्ट व्हायरल होत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही असं वक्तव्य केल्यानंतर मराठा समाजातून त्यांच्या निर्णयाचे स्वागत केलं गेलं परंतु पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावी अशी मागणी केली तर मराठा समाज त्यांना मानाचा फेटा आणि एकजुटीने सोबत राहण्याचा शब्द देतील असाही मराठा समाजाच्या वतीने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीने वंजारी समाजाला हक्काचं आरक्षण मिळवून दिल त्याच पद्धतीने पंकजा मुंडे यांनी सुद्धा मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं ओबीसी प्रवर्गातील 50% च्या आतील आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने केली जात आहे. मराठा समाजाला 50% च्या आतील ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी केली तर मराठा समाज आयुष्यभर वंजारी समाज अपेक्षा देखील जास्त प्रेम करेल यातही तीळ मात्र शंका उरली नाही अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.
पंकजाताई मराठ्यांना आरक्षण फक्त ओबीसीतूनच मिळू शकत
भारतीय जनता पार्टीच्या लोकनेते पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण वेळेपर्यंत फेटा बांधणार नाही असे वक्तव्य केल्यानंतर मराठा समाजाने देखील त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले परंतु मराठा समाजाला फक्त ओबीसी प्रवर्गातून 50% च्या आतील आरक्षण मिळू शकते त्यामुळे पंकजाताई तुम्ही फक्त मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी करा एवढी मराठा समाजाकडून विनंती आहे अश्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळून दिल्यास पंकजाताईला मराठा समाज डोक्यावर घेईल!
अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणामुळे शिक्षणापासून नोकरी पासून वंचित राहू लागला आहे प्रार्थना आज पर्यंत मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतली परंतु आज त्याच मोठ्या भावाला आरक्षणाची गरज भासत आहे परंतु त्यांची बाजू घ्यायला कुणी तयार नाही आत्ताच पंकजाताईंनी मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही असं वक्तव्य केल्यानंतर समाजाने पंकजाताई तुम्ही फक्त मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी करा आणि मराठ्यांना आरक्षण ओबीसी कोट्यातून मिळून द्या अशी विनंती करत मराठा समाजाने हाक दिली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल तर तुम्हाला मराठा समाज डोक्यावर घेईल यातही तीळ मात्र शंका नाही. अशा पोस्ट व्हायरल होत आहेत.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून दिले ; पंकजाताई तुम्ही आता मराठ्यांना आरक्षण मिळून द्या!
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी वंजारी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळवून दिल्याने वंजारी समाजाला एक प्रकारे सर्व क्षेत्रात संजीवनी मिळाली आहे त्याच पद्धतीने पंकजाताई तुम्ही सुद्धा आता मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून मराठा समाजाला संजीवनी देण्याची भूमिका घ्यावी मराठा समाज तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहील अशा भावना व्यक्त होत आहेत.