फेसबुकच्या पोस्टवर हजारोंचा समुदाय जमवणारी एकमेव डीपीआय!
★बीड लोकसभेत बदल तर देशात बदल आजपर्यंतचा इतिहास
बीड | अतुल शेलार
बीड लोकसभेचे वातावरण अगदी गरम होत असतानाच डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आघाडीला जाहीर पाठिंबा दिला. बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ताकत असल्याने बीड जिल्ह्याच्या खासदाराच्या विजयाचा तोरण डी पी आय बांधणार असल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे यांनी व्यक्त केला आहे.
आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी काल नीलकमल हॉटेल येथे डी पी आय संघटनेच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक फक्त एका पोस्टवरून पदाधिकाऱ्यांना आव्हान करण्यात आले होते तर काही क्षणातच हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती हे पाहून बजरंग बाप्पा देखील आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी देखील डीपीआयचं व अजिंक्य भैय्यांचं कौतुक भर सभेत केल. यावेळी संदीप भैया ने देखील डीपीआयचं व त्यांच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करत तुम्ही देखील विजयाचे साक्षीदार होणार आहात त्यामुळे सर्वांनी जोमाने करा असे आवाहन केले तसेच मोराळे यांनी देखील मनोगत व्यक्त करताना बीड जिल्ह्यात आज पर्यंत कसलाच विकास झालेला नाही पण सत्ता मात्र त्यांच्याकडेच राहिली आहे त्यामुळे ही सत्ता उलटून टाका आणि विकासाची कस धरणाऱ्या पवार साहेबांच्या उमेदवाराला निवडून द्या असे आव्हान केले. यावेळी डी पी आय चे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तालुका कार्यकर्ते, तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्वच आघाडी मधील पदाधिकारी महत्त्वाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
★बाप्पांकडून अजिंक्य भैय्या च कौतुक!
मी आज पर्यंत फक्त पेपर मध्ये किंवा सोशल मीडियावर अजिंक्य भैय्या च नाव ऐकलं होतं परंतु आज मी प्रत्यक्षात पाहिले ऐकले तर मला आश्चर्याचा धक्काच बसला त्याला कारणही तसंच आहे एका फेसबुक पोस्टवर जर हजारो कार्यकर्ते जमवण्याचे ताकद कोणात असेल तर ती डीपीआय आणि अजिंक्य भैय्या मध्ये आहे. खरंच हे वैचारिक वादळ आहे, हेच वादळ भविष्यात मोठा नेतृत्व करेल यात तीळ मात्र शंका नाही.
★छत्रपती शिवरायांपासून चा इतिहास, खरे वैचारिक आणि निष्ठावंत मावळे आम्हीच!
इतिहासाची पान उलटली तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सुद्धा वैचारिक दृष्ट्या, ताकतीने, निष्ठेने कुणी सोबत राहिल असेल तर ते बहुजन वर्गातील मातंग समाज तितक्याच जोमाने खंबीरपणे ताकतीने उभा राहिलेला आपल्याला इतिहासात सुद्धा पाहायला मिळेल त्याच पद्धतीने आज शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत आणि त्यांच्या विचारासोबत आमची डी पी आय संघटना खंबीरपणे उभी आहे, आणि बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या विजयाच तोरण सुद्धा डी पी आय बांधणार यात तीळ मात्र शंका नाही.
– अजिंक्य भैय्या चांदणे
प्रदेशाध्यक्ष : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया.
★नेते गेले पण जनता साहेबांसोबतच!
बीड जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे बीड जिल्ह्यातील सर्वच नेते जरी पवार साहेबांना सोडून गेले असले तरी देखील सर्वसामान्य जनता निष्ठेने वैचारिक दृष्ट्या शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत असल्याने बीड जिल्ह्याचा खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या रूपाने आपल्याला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनीच आपापल्या परीने जोमानं काम करा आणि आपला खासदार संसदेत पाठवा असे आव्हान संदीप क्षीरसागर यांनी केले.