11.5 C
New York
Sunday, April 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

पाटोद्याची शिवसेना बजरंग बाप्पांसाठी जोमाने लागली कामाला!

★जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या निवडी व बजरंग सोनवणे यांना विजयी करण्यासाठी महत्त्वाची बैठक

पाटोदा | प्रतिनिधी

पाटोदा तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पक्षाकडून आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना विजयी करण्यासाठी महत्त्वाची बैठक डोरले निवासस्थानी पार पडली. शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते व तालुकाप्रमुख मुकुंद शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली विविध पदांच्या निवडी व पत्र देऊन लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक पाटोदा येथे संपन्न झाली यावेळी शिवसेनेच्या नवीन नियुक्ती देण्यात आल्या. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारासाठी आणि त्यांच्या विजयासाठी पाटोदा तालुक्यातील शिवसेना जोमाने उतरले असून जिल्हाप्रमुखांनी त्या पद्धतीने आदेश दिले असून तालुकाप्रमुख मुकुंद शिंदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना सुद्धा केल्या असून येणाऱ्या निवडणुकीत पाटोदा तालुक्यातून शिवसेनेची पूर्ण ताकद महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी खंबीर उभा असलेली दिसेल यातील मात्र शंका नाही असे देखील सांगितले. पाटोद्याची शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे साठी लागली जोमाने कामाला. पाटोदा येथे महत्त्वाची बैठक संपन्न झाली यावेळी महिला आघाडी तालुका प्रमुख प्रतिभा वणवे, युवासेना शहर प्रमुख अजिंक्य डोरले, शिवसेना उपतालुका अशोक पवार, उप सोमीनाथ लवुल, सचिन वणवे, अनिल ताबे, अल्पसंखक सेल तालुका प्रमुख लालू शाहा, शेतकरी सेना तालुका प्रमुख रामेश्र्वर नागरभोजे, तालुका संघटक सुधाकर घोशीर विभाग प्रमुख, संतोष ताबे , केलस काशीद, सतीश शिंदे, संतोष गाचाडे, विशाल शिंदे, माधव डोरले, हनुमंत वणवे, सर्व शिवसैनिक व युवासेना व महिला आघाडी उपस्थित होते…

★पाटोदा शिवसेनेची ताकद बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी खंबीर

पाटोदा तालुक्यातून बजरंग सोनवणे यांना मोठ्या प्रमाणात मतदान व लीड देण्यासाठी शिवसेना जोमाने कामाला लागले असून महत्त्वाची बैठक आज पाटोदा तालुक्यात संपन्न झाली यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून सर्वांना जोमाने कामाला लागण्याच्या आधी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते व तालुकाप्रमुख मुकुंद शिंदे यांनी दिले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!