★पाटोदा तालुक्यातील नेते कार्यकर्त्यांसह जनता लागली कामाला
पाटोदा | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार व इंडिया आघाडीचे 39 बीड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्या प्रचारार्थ सारिका बजरंग सोनवणे यांचा पाटोदा तालुक्यातील सोमवार दिनांक 29/04/2024 चा दौरा अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पाटोदा तालुक्यातील नेते कार्यकर्ते आणि जनता बजरंग सोनवणे यांना विजयी करण्यासाठी सरसावली आहे.
पाटोदा तालुक्यातील उखंडा, पिठी, नायगाव, रोहतवाडी, बेदरवाडी, डोमरी, निरगुडी, तगारा, दसपिंपळगाव, सगळेवाडी, गारमाथा, भाटेवाडी, नाळवंडी, कारेगाव, जालनेवाडी, मांडवेवाडी, तुपेवाडी, मळेकरवाडी, तळेपिंपळगाव, जवळाला, बेलेवाडी, नफरवाडी, मेंगडेवाडी यांच्यासह पाटोदा तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन सारिका सोनवणे यांनी जनतेला संबोधित करत तुतारी वाजवून जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आव्हान केले. यावेळी पाटोदा तालुक्यातील सर्व नेतेमंडळी कार्यकर्ते आणि प्रत्येक गावातील जनता तितक्यात उत्साहाने स्वागतासाठी तयार होती.
★पाटोदा तालुक्यात तुतारी जोरदार वाजणार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे व आघाडीचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांची निशाणी तुतारी पाटोदा तालुक्यात जोरदार घुमू लागली आहे. सर्व जनतेच्या तोंडी तुतारीचा आवाज आल्याने मतदार रुपी तुतारी जोरदार वाजणार असल्याचा सुद्धा पाटोदा तालुक्यातील समोर येत आहे.