पाटोदा तालुक्यातील विविध गावात मराठा एकजुटीचे दर्शन खूप मौल्यवान!
★आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिली भेट ; रात्री बारा एक पर्यंत गावची गावे पाटलांच्या स्वागतासाठी जागे!
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा तालुक्यातील सोने गावच्या ग्रामस्थांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पेढे तुला कळवण्यात करण्याचे ठरवले होते परंतु ही पेढे तुला आणि आपलं प्रेम हे निश्चितच लाख मोलाचे आहे परंतु सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्यानंतरच करू असं जरांगे पाटलांनी सांगितलं आणि पाटोदा तालुक्यातील सर्वच मराठा बांधवांच्या मनात अधिक घर घट्ट करून घेतलं. माझ्यासमोर एकच ध्येय आहे ते म्हणजे तुमच्या लेकरा बाळांचे भविष्य उज्वल व्हावे आणि त्यांचे कल्याण व्हावे एवढीच इच्छा बाळगून हा लढा सुरू केला आहे आत्तापर्यंत आपण सर्वांनी या लढ्यात सहभागी होऊन मला बळ दिले आहे यापुढे देखील आपण आपली एकजूट अशीच कायम ठेवायची आहे नारायण गड येथे ऐतिहासिक सभेची आता तयारी करा आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करेपर्यंत कोणत्याही प्रकारची माघार घेणार नाही मराठा समाजाचे कल्याण होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मंगळवारी पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय या ठिकाणी रात्री साडेदहा वाजता मनोज जरांगे पाटील यांची आगमन झाले दुपारी दोन वाजता ठरलेली वेळ असताना एवढा उशीर होऊन देखील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहात जरांगे पाटलांचं वाजत गाजत फटाक्याच्या अतीज बाधित स्वागत केले. त्यानंतर मनोज रांगे पाटील यांनी पाटोदा तालुक्यातील सौंदाना सोनेगाव पाचंग्री दासखेड नफरवाडी पारगाव या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत भेटीगाठी घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी देखील भेट घेऊन सांत्वन केले. तसेच सोनेगाव या ठिकाणी समाज बांधवांशी संवाद जाताना आपली एकजूट कायम ठेवण्याची आव्हान करून समाजातील तरुणांनी आरक्षण समजून घेऊन या लढ्यात सहभागी व्हावे त्याचप्रमाणे राजकीय कार्यक्रमांना सभांना जाणे टाळून आता नारायणगड येथील ऐतिहासिक सभेची तयारी करून या लढ्यात एक जुटीने सहभागी होण्याचे आव्हान केले. शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायण गड येथे आठ जून रोजी 900 करवर महासभा घेतली जाणार असून त्यासाठी तयारी सुरू आहे राज्य सोबतच बाहेर राज्यातून देखील मराठा बांधव मोठ्या संख्येने येणार असून जरांगे पाटील मराठ्यांना एकत्रित करण्यासाठी पायात भिंगरी घालून फिरत असून पाटोदा तालुक्यातील दौऱ्यावर असताना मराठा बांधवांकडून मिळालेले प्रेम आणि मराठा बांधवांची झालेली एकजूट हे मोठे यश आहे येणाऱ्या काळात सगेसोयऱ्याची अंमलबजावणी होईपर्यंत आपल्याला अशीच एकजूट कायम ठेवायचं आव्हान देखील करण्यात आले आहे.
★सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्यानंतरच तुला
पाटोदा तालुक्यातील सोनेगाव च्या ग्रामस्थांना कुणबी प्रमाणपत्राचा मिळालेला लाभ हा खूपच मोठ्या प्रमाणात आहे. सोनेगाव ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांची पेढे तुलेची तयारी केली होती परंतु जरांगे पाटील यांनी यावेळी आपले प्रेम हे निश्चितच लाख मोलाचे आहे परंतु सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्यानंतरच पेढे तुला घेईल असे सांगून एकजुटीने या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
★सोनेगाव प्रमाणे इतर गावांनी ही शंभर टक्के मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हावे!
पाटोदा तालुक्यातील सोनेगाव हे मराठा आरक्षणाच्या लढ्यात पहिल्यापासूनच सगळ्यात पुढे आणि शंभर टक्के सहभागी होणारा गाव म्हणून पाहिलं जात आंदोलन असतील मोर्चे असतील मिळावे असतील प्रत्येक ठिकाणी गाव 100% सहभागी होऊन आरक्षणाच्या लढाईत आपलं योगदान देत आहे येणाऱ्या काळात देखील सोने गावच्या ग्रामस्थांनी शंभर टक्के सहभागी होण्याचं ठरवले असून इतर गावाने सोनेगावचा आदर्श घेऊन शंभर टक्के सहभाग नोंदवून आरक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.