सर्वच नेते पंकजा मुंडेंसोबत पण जनता कोणासोबत ?
★खा.प्रीतम ताईला 70 हजाराची लीड होती यावेळेस पंकजाताईला कितीची मिळणार ?
आष्टी | सचिन पवार
गेल्या वेळेस लोकसभा निवडणुकीत खासदार प्रीतम मुंडे यांना आष्टी मतदार संघातून जवळपास 70 हजाराच्या वर लीड मिळाली होती. त्यावेळेस पक्ष वेगवेगळे होते नेते वेगवेगळे होते परंतु यावेळेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना सर्वच पक्ष आणि सर्वच नेते लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे सोबत असल्याने आष्टी मतदार संघातून गेल्या वेळेस 70 हजाराच्या वर मिळाली होती यावेळेस किती मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे यावेळेस आमदार बाळासाहेब आजबे आमदार सुरेश धस आमदार भीमराव धोंडे आणि सर्वच स्थानिक पदाधिकारी पंकजा मुंडे यांच्या सोबत असल्याने सर्वात जास्त लीड मिळणं अपेक्षित आहे, पण यावेळेस जनता नेत्यांच ऐकणार की स्वतःच्या मनाचं हे पहावं लागणार आहे.
खासदार प्रीतम मुंडे यांना आष्टी मतदारसंघातून गेल्या वेळेस मिळालेली 70 हजाराच्या वरची लीड यावेळेस कमी होणार का त्यात भर पडणार हे अधिक महत्त्वाचं ठरणार आहे कारण की यावेळेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना एकत्र असल्याने सर्वच आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच सदस्य पदाधिकारी सर्वच एकत्र असल्याने या लीडमध्ये दुप्पट तिप्पट भर पडणे अपेक्षित आहे. आष्टी मतदार संघातून सर्वाधिक लीड पंकजा मुंडे यांना मिळणे अपेक्षित आहे कारण की दोन आमदार अनेक माजी आमदार तसेच दहा-बारा जिल्हा परिषद सदस्य सोबत आहेत. पण एवढं असतानाही प्रचारामध्ये उत्साह वाटत नाही सभेला नवचैतन्य मिळाल्यासारखं कुठे दिसत नाही. मग लीड मिळणार किती कमी होणार हे पण महत्त्वाचं ठरणार आहे. आष्टी मतदार संघातून लीड जर कमी झाली तर त्याला जबाबदार कोण असणार ? आणि लीड वाढली तर ती कुणामुळे वाढणार ? हे पण अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.
★खा.प्रीतमताईं पेक्षा अधिक लीड मिळणार का कमी होणार ?
आष्टी मतदारसंघातून गेल्या वेळेस खासदार प्रीतम मुंडे यांना 70 हजारापेक्षा जास्त लीड मिळाली होती त्यावेळेस राष्ट्रवादी आणि भाजपची सरळ सरळ लढत होती परंतु यावेळेस राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना एकत्र असल्याने 70 हजाराची लीड अधिक वाढणार का कमी होणार ? हे अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. ती लीड वाढली तर नेत्यांमुळे आणि कमी झाली तर तीही नेत्यांमुळेच असं बोललं जात आहे.
★आमदार आजबे, मा.आ.धोंडे, आ.धस तिघेही सोबत पण गट दोन
लोकसभेचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेसाठी आमदार बाळासाहेब आजबे आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे हे तिघेही प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत सर्वांकडून जोरदार प्रचार सुरू आहे परंतु आमदार बाळासाहेब आजबे आणि धोंडे एकत्र प्रचार करत असून आमदार सुरेश धस यांनी स्वतः वेगळा गट करत वेगळा प्रचार सुरू केला आहे त्यामुळे आष्टी मतदारसंघातून मिळणारी लीड ही कुणामुळे मिळणार हाही प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व सोबत असताना मिळणार मतदान हे कुणामुळे मिळाले आणि विधानसभा कोणाला मिळणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत..
★पंकजा मुंडे यांच्यासोबत आ. आजबे, धस, धोंडे पण जनतेचे काय ?
आष्टी मतदार संघातून लोकसभेचे उमेदवार पंकजा मुंडे यांना दोन लाखाची लीड मिळणे अपेक्षित आहे, कारण की आमदार बाळासाहेब आजबे, आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे हे तिघेही सोबत आहेत. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर जनता नेत्यांचं ऐकणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
★पंकजाताईचे विकास कामे तीन आमदारांची साथ मग होणार का दोन लाख पार ?
पंकजाताई जेव्हा कॅबिनेट मंत्री होत्या तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये विशेष करून आष्टी मतदार संघामध्ये कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला त्याच विकास कामाच्या जोरावर आणि सध्या आष्टी मतदार संघातील तीनही आमदार सोबत असल्याने खासदारकीला पंकजा मुंडे यांना दोन लाखाच्या वर लीड मिळणार का असाही आशावाद व्यक्त होत आहे. एकूणच पंकजाताईचे विकास कामे तीन आमदारांची साथ मग होणार का दोन लाख पार ? अशा चर्चा होत आहेत.